दिलासादायक : जिल्ह्यात सलग आठव्या दिवशी नव्या बाधितांपेक्षा बरे होणारे अधिक

0

जळगाव  : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या नव्या बाधितांपेक्षा अधिक नोंदली गेली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी रेटही ७९.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. दिवसभरात ८२० रुग्ण बरे झाले, तर ४०३ नवे रुग्ण आढळून आले. गेल्या २४ तासांत आठ रुग्णांच्या मृत्यूनंतर एकूण बळींची संख्या ११४५ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असताना गेल्या काही दिवसांपासून नव्याने आढळणारे रुग्ण कमी व बरे होणारे अधिक, असे चित्र दिसत आहे. आज सलग सातव्या दिवशी बरे झालेल्यांची संख्या अधिक होती.जिल्ह्यातील तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर- ९१, जळगाव ग्रामीण- १३, भुसावळ-६६; अमळनेर-२९; चोपडा-३०; पाचोरा-२; भडगाव-४; धरणगाव-२०; यावल-३३; एरंडोल-२१; जामनेर-१८; रावेर-७; पारोळा-२४; चाळीसगाव-२५; मुक्ताईनगर-१०; बोदवड-०५ आणि इतर जिल्ह्यांमधील ५ असे एकुण ४०३ रूग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, आज ८२० रूग्ण बरे झाले असून आजवर बरे होणार्‍यांची संख्या ३६,७८१ इतकी झाली आहे. तर आज ८ मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ११४५ वर पोहचला आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोनाचे सक्रीय रूग्ण ८३४९ इतके आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.