देशात कोरोनाबाधितांचा आकडा २७ लाखा पार ; २४ तासात ५५ हजार ०७९ नवे रुग्ण

0

नवी दिल्ली : देशात मागील काही दिवासापासून ६० हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत होता. मात्र गेल्या दोन दिवसापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होतानाचे दिसून येत आहे.  गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ५५ हजार ५५ हजार०७९ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ८७६ रुग्णांच्या मृत्यूंचीही नोंद झाली.  देशातील करोनाबाधितांच्या संख्या २७ लाख २ हजार ७४३ वर पोहोचली आहे.

दरम्यान, देशात सध्या ६ लाख ७३ हजार १६६ अॅक्टिव्ह केसेस आहे. आतापर्यंत १९ लाख ७७ हजार ७८० जणांनी करोनावर मात केल्याची माहिती आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली. तसंच देशातील एकूण मृतांची संख्या वाढून ५१ हजार ७९७ इतकी झाली आहे. दुसरीकडे देशात १७ ऑगस्टपर्यंत ३ कोटी ९ लाख ४१ हजार २६४ जणांची करोना चाचणी करण्यात आली. तर १७ ऑगस्ट रोजी देशात ८ लाख ९९ हजार ८६४ करोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.