फैजपूर नपा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत रक्कम त्वरित द्या

0

फैजपूर (प्रतिनिधी) : येथील नगरपरिषद सेवानिवृत्त पेन्शनर कर्मचारी बांधवांचे देय असलेल्या थकित रक्कमा व सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे पहिल्या हप्ता देय आहे व आता‌ दुसरा हप्ता सुध्दा देय झाला आहे. परतुं पहिल्या हप्त्याची रक्कम अद्याप नगरपरिषदेने दिलेली नाही.तरी सदर पहिल्या हप्त्याची रक्कम  तुर्तास सेवावृत्त व कर्मच्यार्यास रोखीने त्वरीत देण्यात यावी तसेच बरेच सेवानिवृत कर्मचारी यांना देय होणारे रक्कम ‌थकित‌आहेत त्या थकित‌ रक्कमा सुध्दा देण्यात याव्यात.बरेच‌ सेवानिवृत्त कर्मचारी कोणी आजारी आहेत, काहिचे पाल्यांचे मुला‌ मुलींचे लग्न  कार्यात साठी पैशाची गरज आहे.असे अनेक आर्थिक अडचणीत भागविण्यासाठी साठी पैशाची आवश्यकता असल्याने व दोन दोन ,तीन तीन वर्षे होवुन गेले आहे.तरी या सर्व गोष्टींचा,बाबींचा विचार करून नगरपरिषदेने पेनशनर लोकांना पैसे अदा करावे.

तसेच सध्या कार्यरत असलेले नगरपरिषदेचे कर्मचारी यांना सुध्दा सातव्या वेतन आयोगाचे फरकाची पहिल्या हप्त्याची रक्कम त्यांचे पी.एफ .चे खात्यात शासनाचे नियमाप्रमाणे जमा करणे आवश्यक आहे .तरी ती रक्कम सुध्दा त्वरेने त्यांचे खात्यात जमा करण्यात यावे या मागण्याचे निवेदन आज दि 31 रोजी फैजपूर नगरपरिषद मुख्याधिकारी यांना  अशोक भालेराव अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग यांनी दिले. सोबत सेवानिवृत्त कर्मचारी  प्रकाश सुरजमल घावरे , सुभाष विष्णु गोयर व तालुका सरचिटणीस शे मुस्तकिम कुरेशी.व पदाधिकारी देविदास तापीराम साळुंके हजर‌ होते.

Leave A Reply

Your email address will not be published.