पोलिसांच्या हक्काची घरे त्यांच्या ताब्यात द्या

0

अमळनेर (प्रतिनिधी):- दि 8 मार्च 2010 रोजी शासनाने अमळनेर येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली. हे काम एकूण 556. 39 लाखांचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर यांच्या मार्फत हे काम पूर्ण झाले आहे. मात्र काम पूर्ण होऊन देखील आज पर्यंत त्या ठिकाणी एक देखील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राहण्यास परवानगी नाही.

जिल्हाधिकारी जळगाव व पोलीस अधीक्षक जळगाव यांनी या निवासस्थानांची संयुक्त रित्या पाहणी देखील केली आहे. या निवासस्थानांची काम पूर्ण झाली असून आता ते पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राहण्यास उपलब्ध करून द्यावे अशी मागणी माजी आमदार कृषिभुषण साहेबराव पाटील यांनी केली आहे. अन्यथा येत्या 15 ऑगस्ट रोजी उपोषणास बसण्याचा इशारा देखील कृषिभुषण पाटील यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.