राममंदिर भुमीपुजनासाठी प.पू. जनार्दन हरिजी महाराज यांना आमंत्रण

0

तापीपूर्णा जल व संत मुक्ताबाई समाधीस्थळाची माती अयोध्येला नेणार

मुक्ताईनगर : अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर ५ आगस्ट रोजी होणाऱ्या मंदिर भुमीपूजन कार्यक्रमास अखील भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष तथा सतपंथ आश्रम फैजपुर येथील महामंडलेश्वर प.पू. जनार्दन हरिजी महाराज यांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले असून तापीपूर्णा संगमावरील पवित्र जल व संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथील पवित्र माती सोबत आणावी असे सांगितले आहे.

महाराष्ट्रातील वारकर्याचे चार धामपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र कोथळी- मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई समाधीस्थळाची माती जी संत मुक्ताई सातशे वर्षांपूर्वी विजेच्या रूपात अंतर्धान ज्या भुमीत‌ झाल्या व जेथे वारकरी संप्रदायातील जेष्ठश्रेष्ठ थोर संत प.पू. जोग महाराज, मामासाहेब दांडेकर,धोंडोपंतदादा, सद्गुरू झेंडूजी महाराज , सद्गुरुसखाराम महाराज अनेक थोर महापुरुषांनी इथले रजकण आपल्या भाळी लावून ज्या भुमीला नतमस्तक झाले अशी पवित्र माती व चांगदेव येथील तापी‌पूर्णा संगमाचे पवित्र जल आज शनिवार १आगस्ट रोजीस.११वा. महामंडलेश्वर प.पू.जनार्दन हरिजी महाराज , श्री‌संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील, आमदार चंद्रकांतभाऊ पाटील , ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे यांचे हस्ते विधीवत पूजन करून संकलीत करण्यात येणार आहे. संपूर्ण खानदेश , विदर्भातील रामभक्तांचे वतिने प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज संत मुक्ताबाई भुमीतील पवित्र जल व माती घेवून अयोध्येकडे प्रस्थान करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.