नगर परिषद साहीत्य चोरी प्रकरणात आणखी तिघांना अटक ; आरोपी संख्या झाली नऊ

0

वरणगाव (प्रतिनिधी) : शहरातील रावजीबुवा परिसरातील अग्नीशमन दलाच्या इमारतीचे २५ दरवाजासह वस्तुची चोरीची घडली.होती त्यात शनिवार रोजी सहा आरोपीस अटक करण्यात आली होती. मात्र रविवार रोजी सायकाळी तीघाना अटक करूण एक दरवाजा हस्तगत केला आहे.

नगर परिषदेच्या अग्नीशमन दलाच्या नव्या इमारतीचे २५ दरवाजे व दोन इलेक्ट्रीक पंपाची चोरीची घटना मागील सोमवार रोजी उघडकीस आली होती. त्या प्रकरणी सुरुवातीस प्रशांत सोपान चौधरी यांना अटक करण्यात आली होती. तर त्याच दिवशी रात्री उशीरा आणखी विपूल अनिल बऱ्हाटे , पवन रमेश माळी यांस अटक केली. तर शनिवार रोजी अमोल चंद्रकात चौधरी यांना अटक करण्यात आली रविवार रोजी सायकळी आणखी मयुर पडिंत झोपे , राहुल उर्फ शिण्या गणेश इगळे शुभम सतोष पाटील यांना अटक करण्यात आली असुन आरोपी कडून २५ पैकी १४ दरवाजे पोलीसानी हस्तगत केले असुन घटनेचा पुढील तपास सह फौजदार सुनिल वाणी पो हे कॉ गणेश शेळके हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.