निपाण्याचे किशोर पाटलांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पदी निवड

0

निपाणे ता, एरंडोल( वार्ताहर) : येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्ता किशोर धर्मराज पाटील यांची नुकतीच एरंडोल तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. किशोर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत असताना माजी मंत्री अण्णासाहेब डॉ, सतिष भास्करराव पाटील यांच्या आदेशानुसार पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युवक कार्यकर्ता म्हणून काम केले.

त्यामुळे किशोर पाटील यांची नियुक्ती तालुकाध्यक्ष पदावर करण्यात आली आहे. या पुढेही वरीष्ठांच्या आदेशाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करेन तसेच गावा गावात नव्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या शाखा स्थापन करुन पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन किशोर पाटील यांनी देशदूत शी बोलतांना दिले. किशोर पाटील यांच्या नियुक्ती बद्दल माजी मंत्री अण्णासाहेब डॉ, सतिष पाटील सह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.