खडकीच्या विवाहीतेचा संशयास्पद मृत्यूने खळबळ

0

माहेरच्यांनी केली ईनकॅमेरा पोस्टमार्टेमची मागणी ।
जामनेर(प्रतिनीधी):- तालुक्यातील खडकी येथील विवाहीतेच्या संशयास्पद मृत्युमुळे डोहरी (ता जामनेर) येथील माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर ठपका ठेवत मृत्यु पावलेल्या विवाहीतेच्या “ईन कॅमेरा” पोस्टमार्टेमची मागणी करून उपजिल्हा रूग्णालयाच्या आवारामधे चांगलाच दांगडो केला.

अंजना तानाजी नाईक (वय३०) असे मयत झालेल्या विवाहीतेचे नाव आहे. या घटनेबाबत सुत्रांनी दिलेली माहिती अशी की मयत विवाहीतेचा मृत्यु झाल्यानंतर तीच्या अंतीम संस्काराची तयारी सासरच्यांनी परस्पर उरकुन घेण्याचे ठरवीले,गावातील काहींनी ही घटना माहेरच्यांना कळविली,त्यामुळे माहेरहुन नातेवाईक मंडळी थेट उपजिल्हा रूग्णालयात पोहचले तेथे वाद होऊन माहेरच्यांनी सासरच्या मंडळींना चांगलेच धारेवर धरत आरोप केला की तुम्हीच आमच्या मुलीला मारून टाकले असल्याचा ठपका ठेवला. आणी तीच्या अंगावर मारहाणीच्याही खुणा आम्ही पाहील्याचे सांगीतले,याप्रकाराने वाद आणखीनच वाढला. अखेर पोलीस निरीक्षक प्रताप ईंगळे यांनी व सहकार्यांनी माहेरच्या मंडळींची समजुत घालुन,त्यांनी केलेली “ईनकॅमेरा” पोस्टमार्टेम”ची मागणी मान्य केली .त्यामुळे मयत विवाहीतेचा मृतदेह पुढील चौकशीकामी जळगाव येथील सरकारी दवाखान्यात पाठवीण्यात आला.या घटनेबाबत दोषींवर सदोष मणुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माहेरच्यांनी केली असता पोस्टमार्टेमचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगीतले.

Leave A Reply

Your email address will not be published.