जळगाव शहरासह भुसावळ,अमळनेर येथे 7 ते 13 जुलैपर्यंत लॉकडाऊनची कडक अंबलबजावणी

0

जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात अधिक तिव्रतेने पसरत असून त्यावर उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जळगाव शहर महानगरपालिका, भुसावळ आणि अमळनेर नगरपालिका क्षेत्र या ठिकाणी दि. 7 जुलैच्या पहाटे 5 वाजेपासून ते 13 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे.

घ्यावी लागणार परवानगी 
जळगाव, भुसावळ, अमळनेर येथील बाजार समितीत केवळ घाऊक व ठोक विक्रीचे व्यवहार सुरू राहतील. किरकोळ खरेदी विक्री करणाऱ्यांना बाजार समितीत परवानगी असणार नाही. रूग्णांना डॉक्‍टरांची गरज असेल तरच वास्तव्यास असलेल्या प्रभागाच्या बाहेर जाता येणार आहे. शेतीच्या कामांसाठी बि- बियाणे, किटकनाशके खरेदी करणे यासाठी संबंधीत क्षेत्राबाहेर जाता येईल. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना शेतीचा सात-बारा उतारा जवळ बाळगावा लागणार आहे. लॉकडाउन लावण्यात आलेल्या क्षेत्रातील पेट्रोल पंप चालकांना फक्‍त अत्यावश्‍यक सेवांच्या व्यक्‍तींना पेट्रोल, डिझेल विक्रीची परवानगी आहे.

हे असेल बंद 
लॉकडाउनच्या काळात किराणा दुकान, लिकर शॉप, सलुन दुकाने, खासगी कार्यालय, कुरिअर, इलेक्‍ट्रिशियन, प्लंबर, गॅरेज/वर्कशॉप आदी दुकाने उद्याने बंद राहतील.

हे असेल सुरू 
मेडिकल स्टोअर, हॉटेल/रेस्ट्रॉरंट (पार्सल सुविधा), ओपीडी, दुध खरेदी विक्री केंद्र, कृषी संबंधीत कामे, कृषी केंद्र, शासकिय कार्यालय, बॅंका, पोस्टल सेवा,

इतर क्षेत्रात हे असेल सुरू 
जळगाव, भुसावळ, अमळनेर वगळता इतर क्षेत्रात प्रवाशी वाहतुक, बस, टॅक्‍सी, रिक्षा, चारचाकी- दुचाकी वाहने, हॉटेल रेस्ट्रारंट (पार्सल सुविधा), मेडिकल स्टोअर, ओपीडी, भाजीपाला- फळे, दुध खरेदी विक्री, कृषी संबंधीत कामे, कंपनी, शासकिय व खासगी बांधकाम, कृषी सेवा केंद्र, किराणा दुकान, लिकर शॉप, सलून, खासगी व शासकिय कार्यालय., बॅंका, कुरिअर, गॅरेज, वर्कशॉप, उद्याने सुरू असतील.

Leave A Reply

Your email address will not be published.