एरंडोल नगरपालिकेचे कारवाई सत्र सुरुच ; पुन्हा केली तिन दुकानं सील

0

एरंडोल (प्रतिनिधी) : शहरात व तालुक्यात सध्या कोरोना रुग्ण झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर एरंडोल नगर पालिकेतर्फे हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. दि.२ जुन रोजी तिन दुकानं सील करुन दुकांदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान एरंडोल शहरात दिवसेंदिवस दिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे.यामुळे एरंडोल शहरातील काही दुकानदार जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेशाचे उल्लंन्घ करतांना आढळुन येत होते.यात शहरातील मेनरोड वरील किराणा दुकानाचे संचालक देवेंद्र शांताराम येवले,म्हसावद रोडवरील पद्मालय प्रोव्हिजन चे संचालक अनिल अंबादास वंजारी व धरणगाव रोडवरील महालक्ष्मी मॉल चे संचालक राकेश आनंदा पाटील यांचे विरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर दुकाने सील करण्यात आली आहे.

सदरकारवाई दरम्यान एरंडोल पोलीस सहा.पोलीस निरीक्षक तुषार देवरे,पोलिस कर्मचारी,यांचे सोबत एरंडोल नगर पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अधिकारी संजय ढमाळ, क्षेत्रिय अधिकारी एस.आर.ठाकुर, के.वी.महाजन, अशोक मोरे, वैभव पाटील, तुषार शिंपी, लक्ष्मण ठाकुर यांच्या पथकाने कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.