संत मुक्ताबाई पालखीचे फटाक्यांची आतिषबाजीत जोरदार स्वागत

0

मुक्ताईनगर : श्री संतमुक्ताबाई पादूका दिंडी काल मध्यरात्री नविन मंदिर येथे दाखल होताच हरिनामाच्या गजरात फटाक्यांची आतषबाजीने जोरदार स्वागत करण्यात आले.

आषाढी एकादशीला पंढरपूरला गेले ली संत मुक्ताबाई पालखी कोरोनामुळे द्वादशीलाच परत निघाली होती. शुक्रवारी पहाटे नविन मंदीर येथे दाखल होताच संत‌ मुक्ताबाई पालखी आगमन सोहळा समितीचे वतीने फटाक्यांची आतषबाजी करून टाळ मृदंगाच्या गजरात स्वागत करण्यात आले.यावेळी पुरुषोत्तम वंजारी , निवृत्ती भाऊ पाटील , विशाल सापधरे , विनायकराव हरणे ,उध्दव जुनारे उपस्थित होते. लोणी ता.जामनेर येथील वारकरी दिंडी स्वागताला आली होती.

राज्य शासनाचे आभार

संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यास विशेष परवानगी देवून संपूर्ण सोहळा शासकीय इतमामात पोलीस संरक्षण व अधिकारी वर्ग देवुन घडवून आणला त्याबद्दल राज्य सरकारचेआभार अध्यक्ष रवींद्र भैय्या साहेब पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.अधिकारी वर्गात समन्वय खुप चांगला होता.

मोहम्मद इस्माईल पालखीचे सारथी

संत मुक्ताबाई पादूका सोहळा यावर्षी पंढरपुरी लक्झरी बसने नेण्यात आला होता.संत मुक्ताई संस्थानाने जळगाव येथील बेदमुथा ट्रव्हल्सची बस सोहळ्याकरिता भाड्याने घेतली होती.त्या बसचे सारथ्य मुस्लिम समाजातील मोहम्मद ईस्माईल व एम एम पठाण या दोघांनी केले.‌चांगली सेवा दिल्याबद्दल रविंद्र पाटील यांनी सन्मान केला.

Leave A Reply

Your email address will not be published.