कोरोना योद्ध्यांसाठी खान्देशातील कलाकारांचा मानाचा मुजरा

0

अमळनेर  | प्रतिनिधी

जगात हॉलिवूड, भारतात बॉलिवुड आहे तसेच खान्देश मध्ये खान्देशवूड असावं आणि याच खान्देशवूड च्या संकल्पनेतून अस्सल खान्देशी कलाकार व शॉर्ट क्लिप क्रिएशन द्वारे कोरोनाशी लढणाऱ्या  योद्ध्यांसाठी आणि घरात राहून साथ देणाऱ्या प्रत्येकासाठी खान्देशातील कलाकारांचा मानाचा मुजरा असलेली ‘लढवय्या मी महाराष्ट्राचा’ ही ध्वनीचित्रफीती आज १ जून रोजी समाज माध्यमात प्रदर्शित झाली असल्याची माहिती दिनेश राठोड (चाळीसगांव) यांनी दिली आहे.यात अमळनेरचे विनय जोशी सरांसह खान्देशातील अनेक कलाकारांचे योगदान आहे.

कोरोना वायरस नावाच्या आजारामुळे मानव जातीचे रक्षण करणाऱ्या भारतातील सर्व जागरूक यंत्रणेला व कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या सर्व डॉक्टर्स,पोलिस,सफाई कर्मचारी,सर्व सरकारी अधिकारी,कर्मचारी ,सेवाभावी प्रतिष्ठान, कष्टकरी, सेवेकरी सर्वांच्या कौतुकास्पद कामगिरि ला सलाम देण्यासाठी व पाठिंबा दर्शविन्यासाठी खान्देशातील प्रसिद्ध कलावंतांचा सदर ध्वनीचित्रफीतीची मूळ संकल्पना  दिनेश राठोड, मनोहर खैरनार याची असुन निलेश गढरी यांनी संकलन केलं आहे. सदर ध्वनीचित्रफीतीत दिनेश राठोड, सचिन कुमावत, मनोहर खैरनार, निलेश गढरी, निलेश जाधव, मृणाल गायकवाड, एकनाथ गोफणे, चंद्रकांत देशमुख, दीपिका पाटे, कुणाल राऊळ, अभिलाष जोशी, हर्षल मराठे, राज पाटील, निकिता देवरे, पूर्वा देवरे, विशू बिऱ्हाडे, स्वयम् खैरनार भटू चौधरी, माधवी छाईलकर, पूनम बेडसे, जागृती गोसावी, आदेश लांडगे, विनय जोशी, बाबुलाल पाटील, विकास सेन, हेमंत कोतवाल, हेमंत चौधरी, अमोल कर्णकार, प्रशांत महाजन, प्राजक्ता कोल्हटकर आदी.

खान्देशातील कलाकारांनी सहभाग घेतला आहे. कोरोना योद्ध्यांसाठी खान्देशातील कलाकारांचा मानाचा मुजरा समाजमाध्यमात १जून रोजी short Clip Creation या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाली असल्याची माहिती दिनेश राठोड यांनी दिली आहे.या ध्वनीफितीत खान्देशातील नंदूरबार शिरपूर जळगांव धूळे जिल्ह्यातिल कलाकारांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.