भडगाव तीन दिवस पूर्णपणे बंद : काही भाग नागरिकांनी केले सिल

0
भडगाव – प्रतिनिधी
 पाचोरा शहरात कोरोना चा रूग्ण सापडला पण भडगावात नागरीकांनी जागरूगता  दाखवत आजपासून तिन दिवस शहर पुर्णपणे बंद करण्याचा स्वयंस्फुर्तीने निर्णय घेतला. त्यामुळे शहरात कोणीही बाहेर फीरतांना दिसुन आले नाही. पोलिस, महसूल व नगरपरिषद प्रशासनाने शहरात रूटमार्च काढत लोकांमधे जनजागृती केली.
भडगाव शहरापासून अवघ्या 12 कीलोमिटर अंतर असलेल्या पाचोरा शहरात कोरोना चा रूग्ण सापडल्याने भडगावकरांनी दक्ष होत तीन दिवस स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला. त्याला आज उस्फूर्त प्रतिसाद मिळाला पुर्ण शहरात एकही माणूस घराबाहेर पडताना दिसला नाही. भडगावकरांच्या या सजगतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
शहरवासीय घरातच थांबून
भडगाव शहरात आजपर्यंत एकही कोरोना बाधित रूग्ण सापडलेला नाही. मात्र शहरवासीयांनी पाचोरा शहरात रूग्ण सापडल्याच्या पाश्वभुमीवर शहर बंद ठेवण्याचा स्वयंस्फुर्तीने घेतलेला निर्णयाची आज शंभर टक्के अंमलबजावणी दिसून आली. शहरातील मुख्य रस्ते, जुने शहर व काॅलनी भागातील रस्त्यावर सामसुम पहायला मिळाला. फक्त दवाखाने व काही ठराविक मेडीकल सुरू होते. मात्र तेथे आवश्यक वैद्यकीय कारणासाठिच लोक आलेले दिसुन आले.  दरम्यान काही भागत नागरीकांनी स्वतः सील केल्याचे दिसुन आले.
शहरात रूट मार्च
शहरात आजपासून तिन दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. त्यापाश्वभुमिवर पोलिस, महसूल व नगरपरिषद प्रशासनानाच्या वतीने जुन्या शहरातुन सयुक्त रूटमार्च काढण्यात आला. यात तहसीलदार माधुरी आंधळे, पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे, मुख्याधिकारी विकास नवाळे, पोलिस कर्मचारी, महसुलचे कर्मचारी व पालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी अनाऊसिंगव्दारे जनजागृतीही करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.