मद्यापेक्षा गुटखा व तंबाखू महाग !

0

जीवनावश्यक वस्तूच्या दुकानाचा आधार घेऊन सर्रास विक्री

पाचोरा (प्रतिनिधी) : सध्या कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असल्यामुळे वाहतूक बंद आहे त्यामुळे जवळपास सर्वच वस्तूंचे भाव थोडयाफार प्रमाणात वाढलेले दिसून आले आहे.

परंतु लॉक डाऊनच्या पहिल्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यात सर्वत्र अवैध मद्य विक्री विषयी मीडियामध्ये बातम्या प्रसारित झाल्या होत्या व चर्चा ही रंगली होती. त्यानंतर काहींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले होते व त्या अनुषंगाने कारवाई देखील झाली होती.

मात्र लॉक डाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात दारू पिणाऱ्यापेक्षा गुटखा व तंबाखूचे भाव मात्र दारू पेक्षा जास्त महाग झाल्याचे चित्र ग्रामीण व शहरी भागात दिसून आले आहे. जिल्ह्यात पानटपरी, पान मसाला व्यवसाय हा पूर्णपणे बंद आहे परंतु जीवनावश्यक वस्तूंच्या आधार घेऊन किराणा दुकानामधून अवैध पद्धतीने अव्वाच्या सव्वा भावाने गुटखा व तंबाखू होलसेल विक्री ही चढ्या दराने विक्री करत आहेत. यामुळे अशा अवैधपणे व्यवसाय करून जनतेची लूट करणाऱ्या व्यावसायिकांवर अन्न व औषध,भेसळ विभाग जळगाव यांच्याकडून करवाई करणे अपेक्षित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.