पोस्ट कार्यालयाने ग्राहकांना सेवा देण्यात घेतली आघाडी

0
कजगाव –  सध्या कोरोना विषाणूने सर्वत्र धुकाकूळ माजवला आहे त्यामळे सर्वत्र अत्यावश्यक सेवा वगळता बंद ची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातच पोस्ट कार्यालयाने देखील आपल्या ग्राहकांना सेवा देण्यात आघाडी घेतली आहे
कजगाव पोस्ट ऑफिस चे सबपोस्ट मास्तर हे आपल्या पोस्ट कार्यालयात असलेल्या खाते दारकांना सेवा देत आहे बँक बरोबरच पोस्ट कार्यालयात ही पैसे काढण्यासाठी  व टाकण्यासाठी ग्राहकांना सेवा मिळत असल्याने पोस्ट च्या खातेदारांनी समाधान व्यक्त केले आहे त्यामुळे बँके बरोबरच पोस्टात विविध सेवा मिळत असल्याने खातेदारांनी भारतीय डाक सेवेच्या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला आहे कजगाव पोस्ट ऑफिस चे सबपोस्ट मास्तर एस पी कोळी यांना पोस्ट कर्मचारी संजय महाजन शरद बाविस्कर सुनील पाटील यांचे सहकार्य लाभत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.