‘बागी 3’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

0

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ याचा ‘बागी ३’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. ज्यात टायगर श्रॉफ पुन्हा एका जबरदस्त अ‍ॅक्शन अवतारात दिसला.

टायगर श्रॉफ आणि अ‍ॅक्शन यांचं नातं वेगळंच आहे. टायगरने प्रत्येक सिनेमात दमदार अ‍ॅक्शन करावी अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा असते. त्याच्या आगामी ‘बागी 3’ मध्येही अशीच अ‍ॅक्शन दिसणार आहे. या सिनेमात रितेश देशमुख टायगरच्या भावाची भूमिका साकारताना दिसत आहे. यावेळी टायगर समोर सिरियातील आतंकवाद्यांचं आवाहन असणार आहे. मागील सिनेमाप्रमाणेच यातही श्रद्धा टायगरसोबत स्टंट करताना दिसणार आहे. यातील अनेक स्टंट चित्तथरारक आहेत. भावाला वाचवण्यासाठी सिरियात गेलेला टायगर तिथे आणखी काय धमाल करतो ते सिनेमामध्ये दिसेलच. बागी 3 यावर्षी 6 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नाडियाडवाला ग्रॅँडसन या सिनेमाचे निर्माते आहेत. अहमद खान हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.