प्रकाश आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

0

भारिप बहुजन महासंघात अनेकांचा प्रवेश;रिमांडहोम मध्ये फळ वाटप

जळगांव:- भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रिमांड होम येथे फळ वाटप करण्यात आले तर समता नगर येथील असंख्य कार्यकर्त्यानी भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला.
प्रकाश आंबेडकर यांचा ६४ वा वाढदिवस राज्यभरात स्वाभिमान सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे.यानिमित्त जळगांव येथील बालसुधार गृह(रिमांड होम)येथे फळ वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नेते तथा माजी जिल्हा सरचिटणीस गमिरभाई शेख हे होते.यावेळी प्रमोद इंगळे, भीमराव सोनवणे,गणेश महाले,जितेंद्र साळवे,मच्छीन्द्र सोनवणे,रिमांड होमचे अधीक्षक डिगंबर पाटिल यांची प्रमुख उपस्थिती होती.

यानंतर समता नगर येथे भारिप बहुजन महासंघात असंख्य कार्यकर्त्यानी भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला.यावेळी आयोजित कार्यक्रमात माजी जिल्हा सरचिटणीस गामीरभाई शेख यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन करतांना सांगितले की, देशाच्या बदलत्या राजकीय वातावरणात अलुतेदार,बलुतेदार,मुस्लिम,अल्पसंख्य, बहुजन समाजाला न्याय देणारे एकमात्र नेतृत्व प्रकाश आंबेडकर असून जो प्रयन्त आपण आपल्या विचारांचे प्रतिनिधी संसद,विधिमंडळात पाठवीत नाही तो प्रयन्त आपल्याला अन्याय अत्याचार सहन करावा लागेल,हे चित्र बद्दलविण्यासाठी सर्वांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे समर्थ शक्ती उभी करण्याची गरज आहे.प्रमोद इंगळे यांचेही यावेळी भाषण झाले.

यांनी केला प्रवेश
माधव निकम,गौतम सोनवणे,सुनील सपकाळे,अनिल सपकाळे,ज्ञानेश्वर मिस्तरी,मनोज महाजन,युवराज तायडे,सागर सपकाळे,विक्रम तायडे,शंकर पारधे,गोपाळ सोनवणे, श्रीकांत पवार,सुनील सोनवणे,परेश कडसकर,आकाश निकम,किसन इंगळे,महेंद्र सपकाळे,पंकज पवार

Leave A Reply

Your email address will not be published.