जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूटची यशस्वी वाटचाल

0

जीवनात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच धेय निश्चित असते. जीवनाची वाटचाल करतांना त्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते, हे शास्वत सत्य आहे. रायसोनी ग्रुपची वाटचाल १९९८ पासून सुरु झाली आहे आणि पिढ्यानपिढ्या घडविण्याचे धेय निश्चित करून शिक्षित समाज निर्माण करण्याचा मानस उराशी आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना विविध गुणांचा श्रुंगार चढविण्याच काम अगदी जोमात सुरु आहे. आज जळगाव येथील रायसोनी इन्स्टिट्यूटला शिक्षण क्षेत्रात १२ वर्ष पूर्ण होत आहेत. शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांनी अभ्यासातच गुंतून राहू नये तर त्याच्या व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, नेतृत्व गुण अशा विविधांगी ज्ञानाच्या कक्षा वृंदावण्याचे काम जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट करीत आहे आणि करीत राहणार.

रायसोनी इन्स्टिट्यूट मधील अभ्यासक्रम – 

अत्याधुनिक काळात साजेल असे शैक्षणिक केंद्र अशी ओळख असणारी ही संस्था क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित असून यामधील विविध अभ्यासक्रमास अखिल भारतीय तंत्रशिक्षण संचालनालय दिल्ली (ए.आय.सी.टी.ई.) व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई आणि राज्य शासनाची मान्यता आहे. तसेच नुकत्याच झालेल्या मूल्यांकनात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नॅक कमिटी कडून सर्वोच्च “अ” श्रेणीचे मानांकन मिळाले आहे. अशा या सबंध महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या संस्थेत जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड मॅनेजमेंट अंतर्गत पदवी स्तरावर  सिव्हिल, मॅकेनिकल, इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजी, कॉम्प्युटर  सायन्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन  हे अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी व पदव्युत्तर स्तरावर बी.बी.ए., बी.सी.ए., बी.बी.ए इन (बिझनेस एनालीस्टीक्स), बी.एम.एस (ई.कॉमर्स), एम.एम.एस (पर्सनल मॅनेजमेंट), आणि एम.बी.ए तसेच इतर विविध प्रमाणपत्र कोर्सेस अभ्यासक्रमात आहेत. कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य व विज्ञान शाखा इंग्रजी माध्यमातून शिकविण्यात येते.

विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास –

विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्यांच्या इतर कलागुणांना वाव मिळावी यासाठी हॉर्स रायडींग, लेट्स टॉक, योगा, ड्रामा अँड एक्टिंग, फोटोग्राफी, आर्ट अँड क्राफ्ट , टोस्ट मास्टर्स, कल्चरल , फिटनेस, स्पोर्ट्स, म्युझिक असे विविध क्लब चालविले जातात. स्वतंत्र प्लेसमेंट विभागाची स्थापना करून विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते. गेल्या वर्षी रायसोनी समूहाने विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी २०० पेक्षा अधिक कंपन्या उपलब्ध करून दिल्या आहेत. इंग्लिश स्पिकिंगसह व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असे उपक्रम व मार्केटींगचे प्रत्येक्ष ज्ञान मिळावे याकरिता रायसोनी मंडी हा उपक्रम तसेच बदलत्या काळात विद्यार्थ्यांना समरस होता यावे यासाठी कश्ती (ए जर्नी टूवर्डस एक्सलंस), टेक्निकल रिसर्च कोम्पिटीशन फॉर स्टूडेन्ट, मार्केटिंग क्लब, न्यूजपेपर एनालिसीस यासारखे उपक्रमही मोलाची मदत करतात. सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते. यामुळे विद्यार्थ्यांना विविध भागातील संस्कृतीचे ज्ञान तथा प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेऊन आठवणी कायम केल्या जातात. महाविद्यालयातील उच्चशिक्षित प्राध्यापकांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी प्रत्येक्ष भेटी देऊन त्यांच्या ज्ञानात भर टाकण्यात येते. त्याचप्रमाणे महाविद्यालयात शिकविणा-या शिक्षकांना देखील उद्योग क्षेत्रातील अद्ययावत माहिती व्हावी यासाठी त्यांना देखील प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम तथा इतर अभ्यासक्रमा व्यतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात झालेल्या आपल्याशी संबंधित बदलांचे अद्ययावत ज्ञान मिळते. विद्यार्थ्यांना निवासासाठी मुला मुलींचे स्वतंत्र वसतिगृह उभारण्यात आले आहे. अशा अनेक सोई सुविधांसह प्रशस्त अशा परिसरात विद्यार्थ्यांना घडविण्यात येते.

रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सची स्थापना १९९८ साली स्व.ग्यानचंदजी रायसोनी यांच्या प्रेरणेतून व परिवाराच्या सहकार्यातून अध्यक्ष मा.सुनीलजी रायसोनी यांनी केली. महाराष्ट्रात नागपूर, पुणे, जळगाव, अमरावती, अहमदनगर मध्यप्रदेशातील छिंदवाडापर्यंत समूहाची यशस्वी वाटचाल सुरु आहे. समूहाच्या अंतर्गत अमरावती व छिंदवाडा येथे स्वायत्त विद्यापीठ सुरु झाले आहे. आजमितीला जळगाव येथील रायसोनी इन्स्टिट्यूटच्या दोन्ही महाविद्यालये स्वायत्ततेच्या मार्गारवर आहेत. रायसोनी इन्स्टिट्यूशन्सचे कार्यकारी संचालक प्रितमजी रायसोनी यांच्या सकारात्मक नेतृत्वाखाली २००७ पासून जळगाव समूहाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यांच्या समवेत संचालिका डॉ.प्रिती अगरवाल, प्राचार्य डॉ.ए.जी. मॅथ्यू, प्राचार्य तुषार पाटील, प्राचार्य प्रल्हाद खराटे महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाला स्वीकारून क्षमतेसह नवीन आव्हाने पेलणारे सक्षम मनुष्यबळ निर्माण करून कुशल उद्योजक घडविणे व रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करणे अशी महत्वकांक्षा रायसोनी  ग्रुपची आहे.

लेखक – अमोल बाविस्कर
जनसंपर्क अधिकारी रायसोनी इन्स्टिट्यूट जळगाव 

Leave A Reply

Your email address will not be published.