भुसावळात तिळवण तेली समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

0

भुसावळ :- समस्त तिळवण तेली समाज वार्षिक  सर्व साधारण सभा दि.३० जून रोजी संध्याकाळी .७.३० वा. तेली समाज मंगल कार्यालय डेली मार्केट भुसावळ येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

बैठकीत मागील सभेचे  इतिवृत्त वाचून कायम करणे, 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 पर्यंत झालेला जमाखर्च वाचणे व मंजूर करणे यासह आयत्यावेळी आलेल्या विषयांवर  सविस्तर चर्चा करण्यात आली.तसेच ईसीसी रेल्वे सोसायटीचे  नवनिर्वाचित सदस्य  रवि  चौधरी , ऑडिटर देविदास चौधरी .व  जेष्ठ समाज बांधवांचा तिळवण तेली समाजातर्फे सत्कार करण्यात आला

यांची होती उपस्थिती

यावेळी  अध्यक्ष संजय श्रावण चौधरी, उपाध्यक्ष बाळू शामराव चौधरी , सचिव अधिक नामदेव चौधरी , कोषाध्यक्ष सुधाकर श्रावण पाटील, ऑडीटर देविदास रामभाऊ चौधरी, यांचेसह  कार्यकारिणी सदस्य  गणेश सोनवणे, दिलीप चौधरी, किरण चौधरी, गोपाळ चौधरी , सुरेश चौधरी, विजय प्रकाश चौधरी व  तेली समाज बांधव उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.