कोळन्हावी : तापी नदीच्या पात्रात अवैधरित्या वाळुचा उपसा

0

प्रशासनाच्या कार्यवाहीआधीच वाळू माफीया वाहने घेवुन पसार

यावल :- तालुक्यातील कोळन्हावी आणी जळगाव शिवारातील तापी नदीच्या पात्रातुन मोठ्या प्रमाणात वाळु माफीयाकडुन वाळुचा उपसा सुरु होता. दरम्यान या ठिकाणी महसुल आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कार्यवाही करण्याआदीच वाळू माफीया हे वाहने घेवुन पसार झाले.

यावल तालुक्यातील कोळन्हायी शिवारातुन गेल्या अनेक दिवसापासुन जळगाव आणी यावल शिवारातील तापी नदीच्या पात्रातुन मोठया प्रमाणात वाळु माफीयाच्या माध्यमातुन वाळुचा बेकाद्याशीर उपसा करून चोरटया मार्गाने वाहतुक करण्यात येत असल्पाची गुप्त माहीती महसुल प्रशासनाला मिळाल्याने दि ३० जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास यातल चे तहसीलदार जितेन्द्र कुंवर, जितेन्द्र पंजे, तलाठी व्ही.व्ही. नागरे, एस.व्ही. सुर्यवंशी तलाठी यावल व महसुलचे कर्मचारी आणी पोलीस प्रशासनाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजीत ठाकरे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने अचानक कोळन्हावी च्या शिवारातील तापी नदीच्या पात्रात जावुन पाहणी केली असता, महसूल आणी पोलीस प्रशासनाच्या पथकाच्या येण्याआदीच वाळु ची बेकाद्याशीर वाहतुक करणाऱ्यांनी आपली ट्रॅक्टर वाहन घेवुन पळुन जाण्यात यशस्वी झालेत. सदरचे पथक हे कार्यवाहीस येत असल्याची गुप्त माहीती ही उघड झाल्यानेच वाळु चोरटे हे पळुन जाण्यात यशस्वी झाल्याची माहीती महसुल प्रशासनास कडुन मिळाली आहे, यासंदर्भात तहसीलदार जितेन्द्र कुंवर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले की कोळन्हावी शिवारापेक्षा अधीक प्रमाणावर  जळगाव शिवारातील तापी नदीच्या पात्रातुन मोठया प्रमाणात वाळुचा उपसा करण्यात येत असुन आपण जळगाव तहसीलदारांना या संदर्भात माहीती लेखी सुचना देणार असल्याची माहिती दिली असुन , कोळन्हावी व शिवारात मोठया प्रमाणात वाळुचा उपसा करून ठीकठीकाणी ठीएलावले असुन ते सर्वं वाळुचे ठीये महसुली प्रशासनाकडुन त्या वाळुचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार जितेन्द्र कुंवर यांनी दिली, आज झालेल्या या कार्यवाहीत जरी महसुल प्रशासनाच्या हाती काही लागले नसले तरी या कार्यवाही मुळे वाळु माफीयाचे धाबे दणाणले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.