8 मार्च पासुन भडगाव तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोव्हीड-19 लसीकरणास शुभारंभ

0

कजगाव-गेल्या 22 मार्च पासुन सर्व जगासमोर कोरोनाचे संकट उभे आहे.त्यातुन हळुहळु बाहेर पडुन आपण कोरोनाच्या संकटावर मात करीत आहोत.भारतात कोव्हीड-19 लसीकरण सुरुही झालेले आहे.भारतात दोन प्रकारच्या लसी दिल्या जात आहे.त्याअनुषंगाने भडगाव येथील ग्रामिण रुग्णालयात लसीकरण सुरुही झालेले आहे.

आता भडगाव तालुक्यातील कजगाव,गुढे,पिंपरखेड व गिरड ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 8 मार्च पासुन लसीकरणाचा शुभारंभ होणार आहे.अशी माहीती भडगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डाँ.सुचिता आकडे यांनी दिली.कोव्हीड-19 चे लसीकरण करण्या संदर्भात आरोग्य विभागाची भडगाव येथे पं.स.हाँल मध्ये मिटिंग पार पडली.याबाबतीत अधिक माहीती देतांना कजगाव येथील वैद्यकीय अधिकारी डाँ.प्रशांत पाटील यांनी सांगितले की ग्रामिण भागात लसीकरणास प्रारंभ होत आहे.

त्यांत 45 ते 59 वयोगटातील कोमाँरबिड व 60 वर्षावरील व्यक्तिंसाठी लसीकरण केले जाणार आहे.भारतात दिल्या जाणाऱ्या भारतीय बनावटीच्या सिरमची कोव्हीड शिल्ड व भारत बायोटेकची कोव्हँक्सिन ह्या दोन्ही पुर्णपणे सुरक्षित असुन नागरिकांनी लस टोचुन घ्यावी.असे आवाहन केले आहे.लस घेण्यासाठी आँनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.तसेच लस घेतांना पोटभर जेवण करणे गरजेचे आहे.सदर मिटिंग प्रसंगी भडगाव तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी,सर्व आरोग्यसहाय्यक,सर्व आरोग्यसहाय्यिका,सर्व आरोग्य सेवक व सर्व गटप्रवर्तक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.