अमळनेर तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अडीच कोटी अनुदान वितरित

0

अमळनेर (प्रतिनिधी) -तालुक्यात फेब्रुवारी ते मे 2020 या कालावधीत अवकाळी वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत वितरित झाली असून त्याअनुषंगाने अमळनेर तालुक्यातील 46 गावांच्या शेतकऱ्यांसाठी 2 कोटी 50 लाख 89 हजार 255 रु.इतके अनुदान अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित झाले असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली.

 

सदर मदत मिळण्यासाठी आ.अनिल पाटील यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा केला होता,यामुळे अतिशय गतीने आर्थिक मदतीची प्रक्रिया पूर्ण होऊन अनुदानाची रक्कम वितरित देखील झाल्याने शेतकरी बांधवात त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे,सदर मदत वितरित केल्याबद्दल आमदार अनिल पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार, मदत व पुनर्वसन मंत्री ना विजय वडेट्टीवार, महसूल मंत्री ना बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री ना दादाजी भुसे, जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.

 

दरम्यान त्यावेळी 2020 मध्ये अमळनेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते,त्यामुळे शासन आदेशानुसार नुकसानीचे पंचनामे होऊन आर्थिक मदत प्राप्त होण्यासाठी प्रस्ताव शासन दरबारी सादर झाला होता, त्याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यासाठी 37 कोटी 51 लाख 25 हजार एवढा निधीं अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित झाला असून अमळनेर तालुक्यासाठी आमदार अनिल पाटलांनी स्वतंत्र पाठपुरावा केल्याने तालुक्यातील 46 गावातील शेतकऱ्यांसाठी सुमारे अडीच कोटींच्या वर अनुदान प्राप्त झाले आहे. सदर मदत लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत.

 

अमळनेर तालुक्यातील या गावांना मिळणार मदत-

अमळनेर, आनोरे, आर्डी, अटाळे, खडके, निर्सर्डी, पिंपळे बु, पिंपळे खु, चिमनपुरी, वाघोदे, जवखेडा, आंचलवाडी, शिरसाळे बु, शिरसाळे खु, लोंढवे, मंगरूळ, शिरूड, चाकवे, खोकरपाट, बहादरवाडी, सुंदरपट्टी, गलवाडे बु, गलवाडे खु, ढेकू सीम, ढेकूचारम, अंबासन, पातोंडा, सोनखेडी, निमझरी, मांजर्डी नगाव खु, नगाव बु, धुपी, कचरे, दहिवद खु, दहिवद बु, कंडारी, म्हसले, देवगाव, देवळी, गडखांब, कुर्हे बु, कुर्हे खु, कुर्हे सीम, खेडी खु प्र अ, टाकरखेडा आदी 46 गावातील 3 हजार 143 शेतकऱ्यांना 1853.23 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने प्रति हेक्टर 18 हजार रु प्रमाणे हे अनुदान मिळणार आहे. तालुका कृषी अधिकारी व पं स चे गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून सदरचे पंचनामे करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.