राष्ट्रीय शिक्षण संस्था निवडणूकीत 78.45 टक्के मतदान ; उद्या निकाल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
चाळीसगाव – चाळीसगाव तालुक्यातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असलेली राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली,
दि 8 रोजी येथील नानासाहेब य ना चव्हाण महाविद्यालयात दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान संपन्न झाले यात 3345 पैकी 2624 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतमोजणी दि 9 रोजी होणार असून राष्ट्रीय सहकारी शिक्षण मंडळावर कब्जा कोणाचा हे स्पष्ट होणार आहे.
चाळीसगाव तालुक्यातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था मध्ये विद्यमान सचिव अरुण निकम यांचे विकास पॅनल व माजी चेअरमन डॉ विनायक चव्हाण यांचे स्मृती पॅनल तर माजी नगरसेवक प्रशांत देशमुख यांचे परिवर्तन पॅनल मधून एकूण 19 जागेसाठी 51 उमेदवार रिंगणात होते. सायंकाळी 4 पर्यंत 2624 मतदान झाले.
ही निवडणूक प्रथमच अत्यंत प्रतिष्ठेची झाली संस्थेची भाड्याने असलेली जागा मुळ मालक जैन ब्रदर्स यांनी सुप्रिमो कंपनीला विकली, खरेदीवरून प्रचारात आ. मंगेश चव्हाण यांना टार्गेट करण्यात येत होतं, त्यामुळे आ. मंगेश दादा चव्हाण यांना पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडावी लागली, तर स्मृती पॅनल मध्ये खासदार उन्मेष पाटील यांचे वडील भैय्यासाहेब पाटील हे उमेदवार असल्याने व जमीन खरेदी व्यवहाराबाबत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खासदार उन्मेष दादा पाटील यांना देखील आपली भूमिका मांडावी लागली. आमदार, खासदार यांचे नाव निवडणुकीत आल्याने या शैक्षणिक निवडणुकीला एक प्रकारे राजकीय रंग चढला होता
निवडणूकीत झालेल्या मतदानात हा मतदानाचा टक्का वाढल्याने विकास पॅनलच्या आशा पल्लवित झाल्या असल्याचे दिसून येते आहे,.

Leave A Reply

Your email address will not be published.