लेवा पाटीदार समाज मंडळाची वधू-वर परिचय पुस्तिका प्रकाशित

0

भुसावळ – श्री सद्गुरु झेंडूजी महाराज (बेळीकर) लेवा पाटीदार समाज संस्था,भुसावळ व श्री महालक्ष्मी ग्रुप भुसावळ, तर्फे सालाबादा प्रमाणे लेवा पाटीदार समाज मंडळाची वार्षिक वधू-वर परिचय पुस्तिका-२०२० प्रकाशन शनिवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी चार वाजता श्री महालक्ष्मी मंदिर, खडका रोड येथे करण्यात आली. प्रसंगी झेंडूजी महाराज बेळीकर संस्थेचे अध्यक्ष दिनेश भंगाळे, सुधीर पाटील, महालक्ष्मी ट्रस्टचे मनोहर बऱ्हाटे, दीपक धांडे, प्रा.धीरज पाटील, वसंत भोगे, पंडित भिरुड, चंद्रकांत पाटील, प्रशांत देवकर, सुपडू भंगाळे, बबलू बऱ्हाटे, प्रकाश पाटील, बाबुराव भंगाळे, लीलाधर भारंबे, मधुकर लोखंडे, दीपक झांबरे, संदीप लोखंडे, संजय बऱ्हाटे, धर्मराज देवकर, अरविंद कुरकुरे, दिलीप बऱ्हाटे, किशोर पाटील व असंख्य समाजबांधव उपस्थित होते.

समाजाच्या परिचयाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आणि विवाहासारखा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटण्यासाठी मागील दहा वर्षांपासून वधु-वर परिचय पुस्तक काढण्यात येते. या उपक्रमातून शेकडो विवाह जुळले आहेत अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष दिनेश भंगाळे यांनी दिली.

झपाट्याने काळ बदलत असून दिवसेंदिवस समाजातील बांधव प्रगती करीत असतांना भारताच्या कानाकोपऱ्यात स्थायीक झाले आहेत.  या अनुषंगाने एका व्यासपिठावर येऊन उपवर-वधूंचे परिचय पुस्तक बनवणे ही कौतुकास्पद बाब आहे़ ती आता काळाची गरज असल्याचे मत समाजातील जेष्ठ मार्गदर्शक सुधीर पाटील यांनी व्यक्त केले.

समाजातील विविध उपक्रमांना सदैव सहकार्य करण्याची भावना दीपक धांडे यांनी व्यक्त केली. वसंत भोगे, अरुण धांडे व उपस्थित मान्यवरांनी आपआपली मते व्यक्त केली.

फोटो: सुचिचे प्रकाशन करतांना दिनेश भंगाळे, सुधीर पाटील, दीपक धांडे, प्रा.धीरज पाटील, वसंत भोगे, पंडित भिरुड, बबलू बऱ्हाटे, पंडित भिरुड, प्रशांत देवकर, संजय बऱ्हाटे, धर्मराज देवकर.

Leave A Reply

Your email address will not be published.