मनुर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाहिला ‘तान्हाजी’ चित्रपट

0

बोदवड – छत्रपती शिवरायांचा पराक्रमी मावळा असलेल्या नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट नुकताच मनुर बु येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बोदवड शहरातील शालिमार टॉकीज मध्ये दाखवण्यात आला.

चित्रपट पाहिल्यानंतर व थिएटरच्या बाहेर येताचं विद्यार्थ्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा दिल्या.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आलेले समाधान बरंच काही सांगून गेले.यावेळी बहुतेक विद्यार्थ्यांनी आपण प्रथमचं चित्रपटगृहात आल्याचे सांगितले.

यावेळी चित्रपट पाहून विद्यार्थी (बालगोपालांचा) आनंद गगनात मावेनासा झाला.

यावेळी विद्यार्थी समवेत शाळेचे मुख्याध्यापक सुरेश सुरवाडे, उपशिक्षक सुनिल पाटील,योगेश धनगर,उपशिक्षिका सौ.भारती पाटील,सौ.भारती खंडेलवाल,श्रीमती मनीषा कचोरे, श्रीमती छाया बहुरुपे,श्रीमती प्रिया खोब्रागडे, उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.