370, तीन तलाकच्या मुद्यांवर विरोधकांचे नक्राश्रू !

0

पंतप्रधान नद्र मोदी यांची राष्ट्रवादी व काँग्रेसवर जोरदार टीका

जळगाव- देशाच्या एकते अखंडतेला बाधा आणणारा 370 कलम व मुस्लिम माता भगिनींवर लादलेले तीन तलाकचा कायदा रद्द केल्याबद्दल काँग्रेस व राष्ट्रवादी नक्राश्रू ढाळत असून जर त्यांच्यात जर हिंमत असेल ते त्यांनी नक्राश्रू न ढाळता बहुमत आणून हा निर्णय रद्द करुन दाखवा, असेे आवाहन त्यांनी जाहीर सभेत केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नद्र मोदी यांच्या विराट सभेचे आयोजन भाजपातर्फे जळगाव विमानतळाशेजारी मोकळ्या जागेत रविवारी दुपारी 12 वा. केले होते. याप्रसंगी ते आपल्या भाषणात बोलत होते. प्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, ना. गुलाबराव पाटील, धुळ्याचे खा. सुभाष भामरे, खा. उन्मेश पाटील, खा. रक्षा खडसे ना. गुरुमुख जगवानी, हरीभाऊ जावळे, आ.राजुमामा भोळे,आ. चंदूभार्इ पटेल, आ. स्मिता वाघ, आ. संजय सावकारे, महापौर सिमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, जि.प. अध्यक्ष उज्वला पाटील, माजी आ. चिमणराव पाटील, सेनेच्या उमेदवार लता सोनवणे,भाजपच्या रोहिणी खडसे खेवलकर, भाजपचे मंगेश चव्हाण,माजी जि.प. अध्यक्ष अशोक कांडेलकर, रिपार्इचे रमेश मकासरे आदी उपस्थित होते.

तुम्ही देणारना महाजनादेश?

पंतप्रधान नद्र मोदी यांनी भाषणाला सुरुवात मराठीतून करत कसं काय जळगावकर? मी बघतोय की महाराष्ट्र महाजनादेशासाठी सज्ज झालाय तुम्ही देणारना महाजनादेश? असा सवाल करत पंतप्रधान नद्र मोदी यांनी मातृभाषा मराठीतून संवाद साधल्यामुळे उपस्थित जनता सुखावली. तसेच आज शरद पौर्णिमा, महर्षी वाल्मीकी प्रगट दिन आहे. त्यामुळे सर्वांच्या उत्तम स्वास्थविषयक कामना त्यांनी व्यक्त केली. एवढा विराट जनसमुदाय असलेली जळगावची ही सभा अद्भुत असल्याचे ते म्हणाले. दुपारच्या रणरणत्या उन्हात आपण थांबलात याबाबत त्यांनी आभार व्यक्त केले. गेल्या देवेंद्र फडणवीस यांना पुनश्च समर्थन मागण्याकरिताच मी आलेलो नसून तुम्ही जो अभुतपूर्व विश्वास एनडीए, भाजपा व माझ्यावर व्यक्त केला त्याबाबत आभार मानण्यासाठी मी आलो असल्याचे ते म्हणाले. चार महिन्यापुर्वी जे समर्थन 130 करोड भारतीयांनी दिले. त्यामुळे नव्या भारताचा नवा जोश जगाला दिसू लागला आहे. मी विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त महाराष्ट्र व हरियाणाच्या माता भगिनींना मतदान करण्याचा आग्रह धरेन यंदा त्यांचे मतदान पुरुषांपेक्षा अधिक असायला हवे. जगात भारताला ज्या सन्मानाने पाहिले जाते याचे कारण तुम्ही आहात. भारत वर्तमानात मजबूत तर भविष्यातील आव्हानांसाठी तयार होत आहे.

जम्मू भारताचे मस्तक आहे.

5 ऑगस्ट को क्या हुवा था? असा सवाल विचारत मोदींनी तो अभुतपूर्व निर्णय झाला होता ज्याबाबत आपण विचारही करु शकत नाही. गेल्या 70 वर्षापासून लडाखचे नागरिक नागरिकत्वापासून वंचित होते. 40 वर्षे त्यावर निर्णय घ्यायला लागेल आम्ही चारच महिन्यात त्याचा निकाल लावला. मात्र याच प्रश्नाबाबत राजकारणी राजकारण करत आहेत हेच दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसी व एनसीपीवाले याबाबत स्वत:ची नाही तर शेजारी राष्ट्राची भाषा बोलत असून राज्यात चकरा मारत आहेत. तर 5 ऑगस्ट रोजी घेतलेला निर्णय अटल असल्याचे ते म्हणाले. विरोधकांत हिम्मत असेल तर आपल्या घोषणापत्रात काश्मिरचा मुद्दा घ्यावा आम्ही 5 ऑगस्टचा निर्णय बदलून टाकू. तीन तलाक बाबत मुस्लिम माताभगिनींना दिलेले आश्वासन पुर्ण केले आहे. मुस्लिम पुरुष फक्त पतीच नाही तर पिता आणि भाऊपण आहे. त्यामुळे पित्याला आपली मुलगी व भावाला आपली बहिणीच्या सुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे.

हे पाच वर्षात झाले काय?

आम्ही वचन दिले होते महाराष्ट्राला स्थिर सरकार, स्वच्छ सरकार, सशक्त सरकार, संवेदनशील सरकार, सर्वांचा विकास करणारे सरकार देण्याचे मी वचन दिले होते ते या पाच वर्षात झाले का? असा सवाल त्यांनी विचारला त्याचप्रमाणे पाच वर्षे  एकच सक्षम मुख्यमंत्रीअसल्याचा उल्लेख त्यांनीकरत कौतुक केले तर पुढच्या पाच वर्षांसाठी परत मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीसांना देण्याचे सांगितले.तसेच राज्यातील घराघरात पाणी देण्यासाठी साडेतीन हजार करोड खर्च होत असलेल्या योजनेची सुरुवात नावातच जल असलेल्या जळगावकडून करायचे असल्याचे त्यानी सांगितले.

नाव न घेता पवारांची खिल्ली

आमच्या पक्षात तरुणांना महत्व आहे. व्यासपीठावरही तरुण मंडळी आहे. मात्र सोशल मिडियावर विरोधकांचा एक व्हिडियो व्हायरल झालाय त्यात एक वयोवृद्ध नेते सोफ्यावर बसले आहेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी दोघांनी त्यांना उभे केले. मोठा हार घालताना एक तरुण नेता हारातून डोकावत होता त्याला हाताच्या कोपराने खुंबा मारत त्यांनी बाजूला केले. युवा कार्यकर्त्यांनाच विरोधकांच्या नेत्याकडून मिळणाऱ्या वागणूकीची त्यांनी खिल्ली उडविली.

खडसेंची अनुपस्थिती

माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांचे ज्येष्ठ बंधू काशिनाथ गणपत खडसे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंत्येष्टीमुळे आ. खडसे सभेस उपस्थित राहू शकले नाहीत.मात्र त्यांच्या सून खा. रक्षा खडसे, मुक्तार्इनगरच्या विधानसभेच्या उमेदवार रोहिणी खडसे खेवलकर उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.