27 फेब्रुवारी रोजी उमविचा पदवीप्रदान समारंभ

0

जळगांव दि.23
उत्तर महाराष्ट् विद्यापीठाचा 26 वा पदवीप्रदान समारंभ मंगळवार, दि. 27 फेब्रुवारी, रोजी सकाळी 10 वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होत असून, त्याची तयारी पूर्ण झाली आहे.
या दीक्षांत समारंभासाठी अमेरिकेत स्थायिक झालेले अनिवासी भारतीय सुप्रसिध्द वौज्ञानिक व उद्योजक डॉ.अशोक जोशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ.अशोक जोशी हे अमेरिकेच्या वौज्ञानिक आणि उद्योजक क्षेत्रातील मोठे नाव आहे. 1966 मध्ये पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथून अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या अशोक जोशी यांनी 1970 मध्ये अमेरिकेच्या नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठातून एम.एस. आणि 1972 मध्ये पीएच.डी पदवी प्राप्त केली. 1973 मध्ये पेन्सेलव्हेनिया विद्यापीठातून ते पोस्ट डॉक्टरल झाले. अमेरिकेतील मान्यताप्राप्त संशोधक आणि उच्च तंत्रज्ञानातील उद्योजक अशी त्यांची ओळख आहे. ऊर्जा, पर्यावरण, जौवतंत्रज्ञान या क्षेत्रात त्यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केलेले असून 100 पेक्षा अधिक अमेरिकन पेटंट त्यांच्या नावावर आहेत. भारतातील अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग आहे.
35 हजार 164 स्नातक :-
या पदवीप्रदान समारंभात 35 हजार 164 स्नातकांना पदव्या बहाल करण्यात येणार आहेत. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे 11 हजार 925 स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे 3 हजार 325 स्नातक, मानव्य विद्याशाखेचे 5 हजार 242 आणि आंतर विद्याशाखेचे 663 स्नातकांचा समावेश आहे.
गुणवत्ता यादीतील 84 विद्याथ्र्यांना या समारंभात सुवर्णपदक दिले जाणार आहे. या समारंभात प्रत्यक्ष पदवी घेण्यासाठी 21 हजार 155 विद्याथ्र्यांनी नोंदणी केली असून त्यामध्ये 222 पीएच.डी.धारक विद्यार्थी आहेत.
यावर्षी प्रथमच पदवी प्रमाणपत्रासाठी विद्याथ्र्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. पेपरलेस कामकाजाच्या दृष्टीने विद्यापीठाने टाकलेले हे पाऊल आहे. यंदा पदवी प्रमाणपत्रावर विद्याशाखेचे नाव छापण्यात आले आहे. तसेच स्नातकाच्या आईचे नाव देखील प्रमाणपत्रावर असणार आहे. प्रमाणपत्रावर क्यूआर कोड राहणार असून या कोडचा उपयोग मोबाईल अ‍ॅप्लीकेशनद्वारे पदवी पडताळणीसाठी होणार आहे.
तसेच समारंभस्थळी सकाळी ठिक 9.00 वाजता विद्याथ्र्यांनी / निमंत्रितांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. संकेतस्थळावर तालुकानिहाय काऊंटरची माहिती देण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या ुुु.र्पाी.रल.ळप या संकेतस्थळावर स्नातकांसाठी डिग्री कोड देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.