जिल्ह्यात अवैध धंदे सुसाट – डॉ. सतीश पाटील

0

जळगाव-
जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. खासदाराच्या नातेवाईकच सट्टा चालवू लागला असून पोलीस अधिक्षक काय ? करत आहेत, असा प्रश्‍न राष्ट्रवादी पार्टीचे आमदार व जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांनी केला.
हल्लाबोल यात्रेच्या यशाबद्दल माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्र परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे स्टंटबाजीतच पुढे आहे, कामांमध्य मात्र मागे आहेत. भाजपा सरकारने निवडणुकीपासून ते आतापर्यंत फक्त आश्‍वासने दिली व मोठमोठ्या घोषणा केल्या परंतु कामे काहीच केले नाहीत. मॅग्नेटीक महाराष्ट्र नावाने पुन्हा अखेरच्या टप्प्यातील फक्त आकडेवारीचा खेळ या सरकारने रंंगवला आहे. यामाध्यमातून जे प्रकल्प जाहीर केले त्यापैकी एकही प्रकल्प जिल्ह्यात अथवा उत्तर महाराष्ट्रासाठासाठी नाही. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पर्यटनासारखे जिल्ह्यात येतात. इतर खाजगी कार्यक्रमांच्या निमित्ताने आल्यावरच बैठक घेतली जाते.उत्तर महाराष्ट्रावर नेहमीच अन्याय होत आला आहे. अशीच स्थिती राहिली तर स्वतंत्र उत्तर महाराष्ट्राच्या मागणीचा विचार करावा लागेल, असा इशाराही डॉ. सतीश पाटील यांनी दिला. याउलट खडसेंबद्दल ते म्हणाले की त्यांचा अधिकाजयांवर वचक होता. अनेक कामे त्यांनी जिल्ह्यात आणली. मात्र महाजन अपयशी ठरले आहे.
स्वत: जलसंपदा मंत्री असतानही गिरीश महाजन हे त्यांच्याच मतदारासंघातही पाणी समस्या सोडवू शकले नाही. त्यांच्या तालुक्यात 73 गावांचा टँकरचा प्रस्ताव आला आहे. तापी खोरे महामंडळात कार्यकारी संचालकपद 2 वर्षापासून रिक्त आहे. एकही अधिकारी येथे थांबायला तयार नाही. अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे, महाजन यांनी जाहीर केले की, हा वीज पुरवठा लवकरच सुरु होईल परंतु अधिकारी म्हणतात आम्हाला आदेश नाही. अशाप्रकारे अधिकाजयांवरही यांचे नियंत्रण आणि वचक राहिलेला नाही, अशी टिकाही सतीश पाटील यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.