24 तासांत देशात 72,049 हजार नवीन कोरोना पॉझिटिव्ह

0

नवी दिल्ली  : सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला नव्यानं कोरोना होणाऱ्या लोकांची संख्या कमी आली आहे. दिवसाला 90 हजाराच्या आसपास कोरोनाचे नवीन रुग्ण मिळत होते ते आता 70 ते 75 च्या आसपास आल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 24 तासांत देशात 72,049 हजार नवीन लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 986 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 67 लाख पार झाला असून आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी 1 लाख 4 हजार 555 लाखांवर पोहोचली आहे. मंगळवारी 81 हजार 945 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर देशात 9 लाख 7 हजार 883 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.