हावडा मुंबई व हावडा अहमदाबाद विशेष गाडी आता दररोज धावणार

0

भुसावळ (प्रतिनिधी) : रेल्वे प्रशासनातर्फे  प्रवाश्यांच्या सुविधे साठी दोन गाड्यांच्या संचालन मध्ये वाढ करण्यात आली आहे. आधी याच दोन गाड्या त्रीसाप्ताहिक मध्ये चालवल्या जात होत्या, आता याच गाडया दररोज धावणार आहेत. या गाड्यांची थांबा आणि वेळ तेच राहतील.

गाडी क्रमांक ०२९१० अप हावडा मुंबई मेल विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशन दिनांक ६ ऑक्टोबर पासून दररोज धावेल. गाडी क्रमांक ०२८०९ डाऊन मुंबई हावडा मेल विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशन दिनांक ८ ऑक्टोबर  पासून दररोज धावेल.

देवळाली ,नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव,भुसावळ, मलकापूर, नांदुरा,जलंब, शेगाव, अकोला, मुर्तीजापुर,बडनेरा या स्थानकावर गाडी थांबेल.  गाडी क्रमांक ०२८३४ अप हावडा अहमदाबाद विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशन दिनांक ७ ऑक्टोबर पासून दररोज धावेल.गाडी क्रमांक 02833 डाऊन अहमदाबाद – हावडा विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशन दिनांक १० ऑक्टोबर पासून दररोज धावेल.

जळगाव,भुसावळ, मलकापूर, नांदुरा,जलंब, शेगाव, अकोला, मुर्तीजापुर,बडनेरा या स्थानकावर गाडी थांबेल .  प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.