१२ वी (सी.बी.एस.ई.) परीक्षेत पोदार इंटरनॅशनल स्कुलचा १००% टक्के निकाल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेचा निकाल आज दिनांक १२ मे २०२३ रोजी जाहीर करण्यात आला.या परीक्षेत जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले आहे.या वर्षी विज्ञान आणि वाणिज्य शाखेतून विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वी ची परीक्षा दिली होती .शाळेची १००% निकालाची परंपरा कायम ठेवीत विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा निकाल पुढील प्रमाणे:

कु. नचिकेत राहुल पाटील ९५.८० % गुण मिळवून इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतून शाळेतून प्रथम क्रमांक तसेच कु. आदित्य सुमित मुथा याने ७९.६० % गुण मिळवून वाणिज्य शाखेतून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला .

विज्ञान व वाणिज्य शाखेतील गुणवंत विद्यार्थी :-

पोदार इंटरनॅशनल स्कूल चे चेअरमन डॉ.श्री पवन पोदार , विश्वस्त श्री गौरव पोदार व श्री हर्ष पोदार तसेच प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी शाळेचे उपप्राचार्य श्री दिपक भावसार यांनी पालकांचे तसेच शिक्षकवृन्दांचे अभिनंदन केले.श्री जितेंद्र पाटील,सौ. कामिनी महाजन,सौ.छाया बोरसे यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले होते.पोदार प्रेप च्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ ,प्रशासकीय अधिकारी श्री जितेंद्र कापडे व शिक्षकवृन्द यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.