1 फेब्रुवारीपासून ‘हे’ नियम बदलणार ; तुमच्या खिशावर होईल परिमाण

0

नवी दिल्ली :  1 फेब्रुवारीला तुमच्या जीवनात काही बदल करणारे नवे नियम लागू होत आहेत. विशेष म्हणजे 1 फेब्रुवारीला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या जातील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. म्हणूनच त्यांच्याबद्दल देखील जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. अर्थसंकल्पाव्यतिरिक्त असे अनेक बदल 1 फेब्रुवारीपासून होणार आहेत. चला तर मग त्या बदलांविषयी जाणून घेऊयात

गॅसच्या किमतीचा निर्णय

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किमतीनुसार भारतीय तेल कंपन्या स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला ठरवितात. ते वाढतात की कमी होतात, हे 1 फेब्रुवारीला समजणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेचा एटीएमबाबत निर्णय

पंजाब नॅशनल बँकेने एटीएम आणि कार्ड नियमाबाबत 1 तारखेपासून बदल केले आहेत. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी एटीएमद्वारे व्यवहार करताना ज्या एटीएममध्येच कार्ड अडकून राहते आणि व्यवहार पूर्ण झाल्यावर बाहेर काढता येते. अशा एटीएममध्येच बँकेचे कार्ड चालेल, असा नवा नियम केला आहे.

फसस्टॅग आवश्यकच

राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना टोल देण्यासाठी फसस्टॅग आवश्यकच आहे ,असा नियम लागू केला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी 15 फेब्रुवारीपासून होणार आहे. 1 जानेवारी 2021 पासून विकल्या गेलेल्या नवीन वाहनांना फसस्टॅगचे बंधन आहे.

जीवन प्रमाणपत्र

पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र आवश्यक असून ते त्यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे अनेकांना जीवन प्रमाणपत्र सादर करता आले नव्हते. त्यांच्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने 28 फेब्रुवारी ही शेवटची मुदत त्यासाठी दिली होती.

मतदान ओळखपत्र डाउनलोड करता येणार

मतदान ओळखपत्र अनेकदा घरपोच मिळत नाही. कधी हरवतात. आता मतदान ओळखपत्र जनतेला मोबाईल आणि संगणकावर 1 फेब्रुवारीपासून थेट डाउनलोड करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने दिली आहे. आयोगाच्या वेबसाईटवरून ती डाउनलोड करता येतील.

Leave A Reply

Your email address will not be published.