४ महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या नराधमाला फाशी

0

अवघ्या २३ दिवसात न्यायालयाने दिला निकाल

इंदूर – शहरातील राजबाडाच्या मेन गेटजवळील ओट्यावर आई-वडिलांच्या सोबत झोपलेल्या अवघ्या ४ महिन्यांच्या बालिकेला उचलून नेत तिच्यावर बलात्कार करून हत्या करणाऱ्या नराधमाला येथील न्यायालयाने अवघ्या २३ दिवसांमध्ये खटला चालवून फाशीची शिक्षा सुनावली आहे . अपहरण, बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात कोर्टाने आरोपीला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. न्यायाधीशांनी ७ दिवस ७-७ तास फक्त हाच खटला ऐकला आणि २१ दिवसांत सुनावणी पूर्ण झाल्यावर २३ व्या दिवशी शनिवारी निकाल दिला. तथापि, नवा पॉक्सो अॅक्ट बनल्यानंतर हे पहिले प्रकरण आहे.

———–अशी घडली घटना ————
– राजबाडाच्या मुख्य गेटजवळ २० एप्रिल २०१८ रोजी सकाळी आई-वडिलांच्या मधोमध झोपलेल्या ४ महिन्यांच्या बालिकेला उचलून आरोपी नवीनने श्रीनाथ पॅलेस बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये नेले होते, तेथे तिच्यावर १५ मिनिटे दुष्कृत्य केले.यानंतर मग एका बिल्डिंगच्या छतावरून फेकून तिची हत्या केली. आरोपी नवीन हा मृत पीडित बालिकेचा मावसा आहे.

———-२३ दिवसांत आला निकाल——-
७ दिवसांत पोलिसांनी सादर केली चार्जशीट.
७ दिवस कोर्टात ट्रायल चालली, यात २९ साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले.
७ दिवसांतच सागर लॅबवरून आली डीएनए टेस्टसाठी ब्लड सॅम्पल रिपोर्ट.
यानंतर शनिवारी निकाल सुनावण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.