४०० वर्षांची परंपरा असलेल्या दत्त जयंती यात्रोत्सवाला सुरुवात

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा तालुक्यातील चोरवड हे प्रभूदत्त महाराजांचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. येथील यात्रोत्सवास भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मार्गशीष महिन्याच्या पौर्णिमेला यात्रोत्सवाला सुरुवात होते.

या वर्षी शनिवार दिनांक १८ तारखेपासून या यात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. चोरवड येथे सुमारे ४०० वर्षापासून दत्त जयंती साजरी केली जाते. चोरवड गावाच्या पश्चिम दिशेला श्री दत्त महाराजांच्या दोन स्वतंत्र लहान व मोठ्या मंदिरात मूर्ती इ.स. १६०२ मध्ये स्थापना करण्यात आली होती. याबाबत सांगितले जाते  की,रावजी बुवा नामक व्यक्ती गावाबाहेर वास्तव करत असे बाबा महानुभाव भिक्षुकी असल्याने बुवा भिक्षुकी करून आपला उदरनिर्वाह करीत असे. रावजी बुवा नियमित माहुरंग गडाची वारी करीत असे उतरत्या वयात वारी करणे शक्य न झाल्याने त्यांनी तसे मंदिरात देवा समोर सांगितले व त्यांच्या झोळीत दोन झेंडूची फुले आली. नंतर ते चोरवडला आले असता त्या फुलांचे रुपांतर दत्तच्या मूर्तीत झाल्याची आख्यायिका सर्वश्रुत आहे.

तसेच यापैकी मोठे दत्त मंदिर हे जवळपास १५० वर्ष छत नसताना उभे होते. सदर मंदिराचे छत एकाच रात्री बांधले गेले असे सांगितले जाते. तसेच लहान मंदिर शेजारी एक औदुंबर झाड असून यात्रेच्या निमित्ताने भूत पिच्छ्यात याचे डोक्यावरील उरे औदुंबराला बांधली जातात. असा इतिहास मंदिराच्या बाबतीत सांगितला जातो. यामुळे पूर्ण खान्देशातून या मंदिरास दर्शनासाठी व मानता मानेने साठी शेकडो महिला पुरुष दूर दुरून चोरवड येथे मुक्कामी येतात.

मंदिर हे महानुभाव पंथाचे एकमुखी दत्ताचे एकमेव स्थान आहे. या ठिकाणी पालखी मिरवणुकीला खूप महत्व असते. साधारणता आठवडाभर यात्रा चालते. चोरवड गावालगत असलेल्या परिसरात या यात्रेचे दरवषी आयोजन करण्यात येते.  या यात्रोत्सवासाठी पारोळा बसस्थानकावरुन दरवर्षी जादा बसेस सोडल्या जातात, परंतु यावर्षी बसेसच्या संपामुळे काय नियोजन होते याकडे लक्ष लागून आहे. चोरवड तसेच परिसरातील गावांतील नागरिक ह्या यात्रेसाठी बैलगाडीनेच येणे पसंद करतात हे या यात्रेचे वैशिष्ट आहे.

यात्रेत विविध वस्तू विक्रीची दुकाने थाटली जातात, यावर्षीही ही सर्व दुकाने सजलेली आहेत. लहान मुलांच्या करमणुकीसाठी पाळणे, झुले थाटली आहेत. याञेला येणाऱ्या भाविकांना ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, जि. प. सदस्य, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने व चोरवड ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभत असते.

झुले,पाळणे व तमाशाचे आकर्षण

मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे कुठे ही यात्रा भरत नव्हत्या. यावर्षीही तालुक्यातील पहिलीच यात्रा असल्याने शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.  तसेच ग्रामीण भागात मनोरंजनासाठी सुविधा उपलब्ध नव्हत्या. परंतु या वर्षी ग्रामपंचायतीने रीतसर परवानगी घेऊन यात्रेची जय्यत तयारी केलेली आहे.

यात झुले, पाळणे व तमाशा आदी चोरवड येथे दाखल झालेले असून ते यात्रेचे आकर्षण ठरणार आहे. यात्रेच्या परवानगी व इतर सुविधा साठी माजी मंत्री डॉ.  सतीश पाटील, प्रांताधिकारी विनय गोसावी, पारोळा पो नि संतोष भंडारे यांचे सहकार्य मिळत असल्याचे सरपंच राकेश पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.