३ व ४ पासून रोटरी जळगावतर्फे प्लास्टिक सर्जरी शिबीर

0
जळगाव, १ –
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय , जीएम फाऊंडेशन,रोटरी जळगाव ईस्ट यांच्या संयुक्त विद्यामाने 3 व 4 फेब्राुवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया त 3 व 4 फेब्राुवारी रोजी सकाळी 8 वाजेपासून ८ वे विनामुल्य शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली .
या शिबीरात वाकडे व बसके नाक सुधार करण्े, गोंदण, मस , चेह­यावरील व्रण, रक्तवाहिन्यांच्या गाठी , तुटलेले बोट, हाताच्या गंभीर जख्मा, भाजल्याच्या ख्ुणा व इतर व्यंगे इत्यादींवर तपासणीकरून प्रसिध्द तज्ञ डॉ. अविनाश येलिकर, औरंगाबाद, डॉ. शंकर सुब्रामण्यम  मुंबई, डॉ.पंकज जिंदल पुणे, डॉ. प्रकाश बंगानी इंदौर हे शस्त्रक्रिया करणार आहेत.
या शिबीरासाठी डॉ.गोविंद मंत्री, जगताप व्यापारी संकुल, स्टेडीयम समोर. डॉ. मोहन छाबडा, पारेख पार्क जवळ, डॉ. वैजयंती  पाध्ये, भास्कर मार्केट, गोदावरी हॉस्पीटल समोर व पाचोरा नगर पालिका कॉम्पलेक्स  आंबेडकर पुतळया जवळ पाचोरा, प्रेमजी भवानजी , मार्केट यार्ड एमआयडीसी व जी.एम.फाउंडेशन कार्यालय , जी.एस. मैदान  समोर येथे संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. या शिबीरासाठी 64 रुग्णांनी नाव नोंदणी केली आहे. तसेच शिबीराच्या दिवश्ी सुध्दा नावनोंदणी केली जाणार आहे. या पत्रपरीषदेला डॉ.भास्कर खैरे अधिष्ठता , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , डॉ.गोविंद मंत्री, डॉ. श्रीधर पाटील, महेश खटोड, डॉ.राहुल बन्साली, चंद्रकांत सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.