३ जानेवारी “महिला शिक्षण दिन”म्हणून साजरा करा ; ओबीसी असोसिएशनचे आवाहन

0

अमळनेर (प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाने थोर समाजसुधारक भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले याचा ३ जानेवारी हा जन्मदिवस “महिला शिक्षण दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय जाहिर केला आहे. तरी संपूर्ण राज्यातील शाळानी व महाविद्यालयानी तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरा करावा

असे आवाहन ओ.बी.सी विद्यार्थी-शिक्षक-पालक विकास आसोसिएशन प्रदेशाध्यक्ष व अखिल भारतीय माळी महासघाचे राष्ट्रीय प्रवक्ते विलासराव पाटील यानी केले आहे.

महाराष्ट्राला पुरोगामी विचाराचा मोठा वारसा लाभला आहे. यामध्ये सामाजिक कार्याचे

अग्रदूत म. ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले याचे कार्य खूप मोलाचे आहे. याची जाणिव ठेवत विद्यमान सरकारने ३ जानेवारी सवित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस “महिला शिक्षण दिन” म्हणून साजरा करण्याचे जाहिर केले आहे. या निर्णयाचे सपूर्ण बहुजन समाजाने स्वागत केले

आहे. ओबीसी असोसिएशन व अखिल भारतीय माळी महासघातर्फे शासनाचे जाहीर आभार सावित्रीबाई फुले या फक्त जोतीराव फुलेंच्या सहचारीणी नव्हत्या तर त्यांचे स्वतत्र असे ठाम

विचार होते स्त्रियांच्या मुक्ती दात्या असणाऱ्या सावित्रीबाई फुले यानी दिलेले शैक्षणिक योगदान त्यांनी आचरणात आणलेली स्त्री उद्धारासाठीचे मुल्ये भावी पीढीसाठी अत्यत मोलाचे

आहेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे स्त्री शिक्षणातील योगदान त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे व त्यानी रुजविलेले शैक्षणिक मुल्ये पुढील पिढीत सक्रमीत होणे गरजेचे आहे. त्यामुळे याचा विचार करुन शासनाने हा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने शाळा

महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये यामध्ये सावित्रीबाई फुले याच्या प्रतिमेचे पूजन करण्यत यावे त्याचेवरील एक पुस्तक वाचावे,शक्य असल्यास व्याख्यानाचे आयोजन करावे विद्यार्थ्यांचे चर्चासत्र आयोजित करावे ऑनलाईन वेबिनार आयोजित करावे.महिला

शिक्षिका,अधिकारी सामाजिक कार्यकर्ते याचा गौरव,पथनाटय,एकपात्री नाटक याचे आयोजन करावे तसेच विद्यार्थ्यासाठी भाषण निबंध लेखन वकृत्व स्पर्धा,एकांकीका इ. कार्यक्रमाचे

शासनाच्या निर्देशानुसार आयोजन करावे असे आवाहन विलासराव पाटील,संजय खलाणे, काशीनाथ माळी,प्रा.जितेंद्र पगारे,अनिल सेनवणे,ईश्वर महाजन,प्रविण पाटील,सतिष वैष्णव, व्ही आर महाजन,वासुदेव माळी,वसुंधरा लांडगे इ.नी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.