२ लाखाची ‘लाच’ भोवली ; तहसीलदार, मंडळाधीकाऱ्यांसह तलाठी एसीबीच्या जाळ्यात

0

बोदवड प्रतिनिधी । बोदवड येथे २ लाख रूपयांची लाच स्वीकारताना तहसीलदार, मंडळाधिकारी आणि तलाठी यांना ॲन्टी करप्शन विभागाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारदार हे फैजपूर ता. यावल यांचे बोदवड तहसीलच्या हद्दीत शेती खरेदी केली. शेतीच्या सातबारावर पत्नीचे नाव लावण्यात आले होते. नंतर कालांतराने शेतीच्या उताऱ्यावर पुन्हा मुळ मालकाचे नाव आल्याने तक्रार यांनी मंडळाधिकारी यांना भेटून पुन्हा शेतीच्या सातबारा उताऱ्यावर त्यांच्या पत्नीचे नाव लावले व उतारा घेतला. नंतर सदर उताऱ्याबाबत तहसीलदार यांनी हरकत घेवून संबंधित पुरावा देण्यासाठी नोटीस काढली.

तडजोडीअंती २ लाख रूपयांची मागणी 

तहसीलदारांनी नोटीस रद्द करण्याच्या मोबदल्यात तहसीलदार हेमंद भागवत पाटील (वय-४०)रा. भरडी ता. जामनेर. ह.मु. बोदवड, मंडळाधिकारी संजय झेंडून शेरनाथ (वय-४७) रा. भुसावळ आणि तलाठी निरज प्रकाश पाटील (वय-३४) रा. हेडगेवार नगर, बोदवड यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ लाख रूपयांची लाच मागितली. तडजोडीअंती २ लाख रूपयांची मागणी केली. दरम्यान आज दुपारी संशयित आरोपी मंडळाधिकारी संजय शेरनाथ याला २ लाख रूपये रोख देतांना एसीबी पथकाने रंगेहात पकडले आहे.

 

यांनी केली कारवाई

यांनी केली कारवाई पोलीस उपअधिक्षक गोपाल ठाकुर, PI.संजोग बच्छाव, PI.निलेश लोधी, सफौ.रविंद्र माळी, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोहेकॉ.सुरेश पाटील, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ,पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.महेश सोमवंशी, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर यांनी कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.