२ कोटी ३९ लाखांचा निधी उपलब्ध केल्याबद्दल आ.शिरीष चौधरींचे शहरवासियांनी मानले आभार

0

फैजपूर प्रतिनिधी: फैजपूर शहरातील नवीन व जुन्या कॉलोनी भागातील रस्त्यावर खडीकरण व काँक्रीटीकरण साठी महाराष्ट्र शासन च्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून फैजपूर नगरपरिषद ला 2 कोटी 39 लक्ष रुपये मंजूर केल्याबद्दल शहरातील कॉलोनी भागातील नागरिकांनी आ.शिरीषदादा चौधरी यांची खिरोदा येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

शहरातील कॉलोनी भागातील मंजूर कामे पुढील प्रमाणे 1) यावल रोडवरील वृंदावन कॉलोनी मध्ये खडीकरण व काँक्रिटिकरण करणे, 2)साने गुरुजी नगर वेल्डिंग वर्कशॉप पासून जानकी नगर पर्यंत काँक्रिटिकरण करणे 3)साने गुरुजी नगर भाग 2 मधील संपूर्ण परिसरात काँक्रिटिकरण करणे,4)लक्ष्मी नगर परिसरात काँक्रिटिकरण करणे, 5)मिरची ग्राऊंड भागात काँक्रिटिकरण करणे, 6)आसाराम नगर मधील ओपन स्पेस मध्ये बाल संस्कार केंद्र बांधणे.या व्यतिरिक्त ताहा नगर, न्हावी दरवाजा ते तडवी मस्जिद रस्ता.ईकबाल केलें वाले ते बशीर तडवी यांचे चक्की पर्यंत रस्ता कोंकरिकरंट करने भागातील काही रस्ते ही मंजूर करण्यात आलेले आहेत.

यावेळी आभार प्रसंगी नगरसेवक केतन भाऊ किरंगे, देवेंद्र बेंडाळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष वसीम महेबु तडवी, चंद्रकांत चौधरी, राहुल महाजन, मुरलीधर राणे, अशोक किरंगे गुरुजी, गणेश पाटील, राहुल फेंगडे, मनोज पाटील गुरुजी, सुरेश कोलंबे, कुंदन चौधरी सर, प्रशांत गाजरे, प्रभाकर रवाचने.कमलाकर गुळवे, योगेश चोपडे, रमेश बोरोले, प्रशांत कपले, वासुदेव कपले सर, डॉ. हरी निळे, दिनेश किरंगे सर  यांसह आदी नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.