२०२६ पर्यंत खासदारांची संख्या १ हजार झाली पाहिजे ; माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

0

नवी दिल्ली : लोकसभेच्या जागा आता वाढवल्या पाहिजे असा सल्ला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिला आहे. 2026 पर्यंत लोकसभेत आणि राज्यसभेत खासदारांची संख्या ही 1 हजार झाली पाहिजे असे त्यांनी सुचवले आहे. गेल्या काही वर्षांत भारताची लोकसंख्या खासदारांच्या तुलनेत वाढली आहे, त्यामुळे आता प्रतिनिधित्त्व करणाऱ्या खासदारांच्या संख्येत वाढ केली पाहिजे असं ते म्हणाले.

यासाठी त्यांनी लोकसंख्या वाढीचा दाखला दिला. 2011 च्या तुलनेत प्रत्येक मतदार संघातील मतदारांची संख्या वाढली आहे. एक खासदार हा जवळपास 16 लाख लोकसंख्येचे प्रतिनिधीत्त्व करत आहे त्यामुळे आता खासदारांची संख्या 2026 पर्यंत 1 हजारांपर्यंत वाढवली पाहिजे असेही ते म्हणाले.

खासदारांची संख्या वाढल्यानंतर त्यांना बसण्यासाठी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये लोकसभेचे सभागृह बनवता येऊ शकते तर लोकसभेच्या सभागृहाचे राज्यसभेत रुपांतर केलं जाऊ शकतं, असाही पर्याय त्यांनी सुचवला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.