१४ वर्षीय मुलाला अज्ञाताने पळविले; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवार येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुरूषोत्तम विलास पाटील (वय १४, रा. जलराम नगर, सावखेडा शिवार जळगाव) हा मुलगा आपल्या कुटुंबियांसह राहतो. १६ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास मित्राकडे जावून येतो असे वडील विलास नामदेव पाटील यांना सांगून गेला. सायंकाळपर्यंत पुरूषोत्तम हा घरी आला नसल्याने त्याचा नातेवाईकांनी शोधाशोध केली.

मात्र मुलगा सापडला नाही म्हणून वडील विलास पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. अज्ञात व्यक्तीविरोधात पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.