हॉकीपटू संदीप सिंग आणि कुस्तीपटू योगेश्‍वर दत्त भाजपमध्ये

0

नवी दिल्ली – ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंग गुरुवारी भाजपमध्ये दाखल झाले. अकाली दलाचे आमदार बाळकौर सिंग हे देखील भाजपमध्ये दाखल झाले. 2012 च्या ऑलिम्पिकमध्ये योगेश्‍वर दत्तने 60 किलो वजन गटात कांस्यपदक जिंकले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे आपण खूप पूर्वीपासून प्रभावित झाल्याचे त्याने सांगितले. 2013 मध्ये त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने देशासाठी सुवर्णपदकही जिंकले होते.

त्याच्याप्रमाणेच भारतीय राष्ट्रीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंगने देखील आता खेळाडू म्हणून सक्रिय राहिल्यानंतर राजकारणात देशाची सेवा करण्याचे ठरवले असल्याचे सांगितले.

2010 मध्ये संदीप सिंग एका रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला होता. अपघाताच्या दोन दिवसानंतर तो आफ्रिकेत होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी रवाना होणार होता. संदीप सिंगकडे सध्या हरियाणा पोलिसात डीएसपी दर्जा आहे. नुकतेच त्याच्या आयुष्यावर “सूरमा’ हा बॉलिवूड चित्रपट आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.