..हे बंद झाले पाहिजे ; कुलगुरूंच्या राजीनाम्यावर फडणवीसांचे विधिमंडळात भाष्य

0

मुंबई : राज्यातील कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी. पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू (बाटू) डॉ. व्ही. आर. शास्त्री यांनी राजीनामा दिल्याचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्य शासन विद्यापीठाच्या कामकाजात हस्तक्षेप करीत आहे असे आरोप होत आहे. त्यामुळे कुलगुरूंनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

 

दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कुलगुरूंच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे. कुलगुरूंनी आरोग्याचे कारण देत राजीनामा दिला असला तरी राज्य सरकारचे आणि मंत्र्यांचे हस्तक्षेप वाढल्याने राजीनामा दिल्याचे ते खाजगीत सांगतात असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

आजपर्यंत कोठेही विद्यापीठांमध्ये राजकारण झाले नाही, मात्र आता होत आहे. विद्यापीठांचे टेंडर कोणाला द्यायचे हे मंत्री ठरवतात. हे आता बंद झाले पाहिजे असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. हे बंद झाले पाहिजे असे फडणवीस यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.