हेल्मेट सक्तीबाबत वाहतूक पोलिसांचा पक्षपातीपणा

0
जळगाव | प्रतिनिधी

रस्ता सुरक्षा समितीने पारित केलेल्या हेल्मेटसक्तीच्या दुसऱ्याच दिवशी शहरात हेल्मेटसक्तीचे आदेश जिल्हाधिकार्याने केलेल्या आदेशाचा वाहतूक पोलीस अधिकाऱ्याकडून हेल्मेटसक्ती पक्षपातीपणा समोर आला.

   या बाबत वृत्त असे की हेल्मेटसक्ती आजच्या दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालया समोरच समाजसेविका वैशाली झाल्टे या त्याच्या काकांसोबत दुचाकीवर कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात होत्या. या वेळी त्याची दुचाकी चालवणारे काका यांनी हेल्मेट घातलेले नव्हते त्यामुळे त्यांना वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अडविले आणि हेल्मेट का घातले नाही अशी विचारणा केली असता काकांनी हेल्मेट घातले नसल्याने त्यांना  500 रुपये कोर्ट मेमो वाहतूक पोलिसांनी दिला . काकांनी सुद्धा हेल्मेट घातले नसल्याने त्याची चूक मान्य केली आणि पोलिसांनी दिलेल्या मेमोचा आनंदाने स्वीकार केला.जिल्हाअधिकारी याच्या हेल्मेट सक्तीच्या आदेशाचे वाहतूक पोलीस चोख पणे अंमलबजावणी करत असल्या बदल वाहतूक पोलिसांचे कौतुक वाटले.
म्हणून समाजसेविका वैशाली झाल्टे आणि त्याच्या काकांनी आपली दुचाकी बाजूला लावून पोलिसांची कारवाई पाहण्यासाठी तेथेच थांबले.परंतु काही क्षणातच त्याचा हिडमोड झाला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसेना असे चित्र समोर पहावयास मिळाले.
           अनेक जण तेथून बीना हेल्मेटचे जात असताना वाहतूकपोलीस अधिकारी कर्मचारी चक्क दुचाकी स्वरांचे तोंड पाहून त्यांना सोडून देत होते.त्यांना कसलाही मेमो  देत नव्हते  एखाद्याला थांबवलेच तर त्यांना मेमो देण्याऐवजी मोबाईल वरून वाहतूक पोलिसांचे  आणि कुणाचे तरी मोबाईलवरून बोलणे होत होते.त्यानंतर वाहतूक पोलीस आणि दुचाकी धारक यांच्यात स्मिथ पाने हस्यआंदोलन होऊन बिना हेल्मेट दुचाली स्वराला पोलिसांचा या पक्षपातीपणाचा जाब विचारण्यासाठी संबधीत समाजसेविका वैशाली झाल्टे यांनी चित्रीकरण करून घेतले.
            हेल्मेटसक्ती अंमलबजावणी करण्यासाठी तेथे उपस्थित असलेल्या पोलीस उपनिरीक्षक महेश देशमुख याना होत असलेल्या पक्षपातीपणा बाबत विचारणा केली असता तेव्हा तुम्ही आम्हाला कायदा शिकवू नका ते आम्ही ठरवू पोलीस निरीक्षकाचे हे वाक्य ऐकून समाजसेविका वैशाली झाल्टे आणि त्याचे काका आवाक झाले एखाद्या चागल्या योजनेची अंमलबजावणी प्रामाणिकपणे झाली नाहीतर त्या योजनेची पर्यायाने हेल्मेटसक्तीच्या आदेशाचे पायपल्ली होते हेच यावरून दिसून आले अशा पोलीस अधीकारी व कर्मचाऱ्यावर संबधीत वरिष्ठ अधिकाऱ्या कडून कार्यवाही होईल का .होत नसेल तर चांगली योजना बदनाम होऊ शकते
 समाजसेविका वैशाली झाल्टे म्हणतात हेल्मेटसक्ती आदेशात होत असलेल्या पक्षपतीपणा संदर्भात आमच्याकडे  सर्व प्रकारचे छायाचित्रे,व्हिडिओ रेकॉर्ड,असून सुद्धा पोलिस अधीकारी ऐकून घेण्यास तयार नव्हते त्यामुळे सर्व प्रकरणांची मी जिल्हाधिकारी याना पत्राद्वारे कारवाईची मागणी केली असून.सोशल मिडियावर सुद्धा त्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मोठ्याप्रमाणात होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.