हृदयविकार आणि सांधेदुखी तपासणी शिबीर

0

चाळीसगाव :-(प्रतिनिधी ) येथील रोटरी क्लब चाळीसगाव ,बापजी हॉस्पिटल आणि वोक्हार्ट हॉस्पिटल नाशिक, यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी बापजी जीवनदीप मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल येथे सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 पर्यंत “हृदयविकार आणि सांधेदुखी तपासणी शिबीराचे” आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये नाशिक येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. विजयसिंह पाटील व ख्यातनाम सांधेरोपण शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. जयेश सोनजे यांच्या कडून रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले जाईल. शिवाय ईसीजी तपासणी, 2 डी ईको (हृदयाची सोनोग्राफी), गुडघा व खुबेदुखीच्या रुग्णांसाठीच्या तपासण्या , नाममात्र शुल्कामध्ये करण्यात येतील. तसेच अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, हृदय झडपांचे आजार आणि जन्मजात हृदयविकारांसाठी शस्त्रक्रिया सांगितलेले रूग्ण ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका आहेत अश्या रूग्णांकरिता वोक्हार्ट हॉस्पिटल नाशिक येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध आहे.

असे रुग्ण ज्यांना हृदयविकाराची लक्षणे जसे की छातीत दुखणे, दम लागणे, छातीत जळजळ, सतत थकवा जाणवणे, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अशक्तपणा, हृदयाचे ठोके जलद किंवा अनियमित होणे याचा त्रास असेल त्यांनी या शिबिरामध्ये येऊन हृदयरोग तज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. शिवाय संधिवात, गुडघ्यात किंवा खुब्यात वेदना, पायात वाक येणे, मांडी घालून बसता न येणे, पायर्‍या चढतांना उतरतांना त्रास होणे, गुडघ्यात किंवा खुब्यावर सूज येणे आणि या सर्व लक्षणांवर औषधांनी फरक न पडणे अशी लक्षणे असतिल तर या शिबिरामध्ये येऊन तपासणी करून घ्यावी व या संधीचा अधिकाधिक संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.