हृदयद्रावक..नियतीचा की कोरोनाचा घाला; अख्खे कुटूंब झाले उध्वस्‍त

0

कोरोनाच्या महामारीत हसत्‍या खेळत्‍या कुटूंबाची घडी विस्‍कटून जात आहे. अगदी सोबत राहणारे काही दिवसात नसणे यासारखे मोठे दुःख आणखी कोणतेच नाही. पण नियतीही आपला खेळ खेळत राहते. अवघ्‍या वीस दिवसात एकाच कुटूंबातील चार जबाबदार व्यक्‍तींचा मृत्‍यू हे खूप मोठा दुःखाचा डोंगर घेवून आले.

 

धरणगाव | विनोद रोकडे 

धरणगाव (जळगाव) : साकरे (ता. धरणगाव) येथील अमृतकर कुटुंबावर कोरोनारूपी मोठी आपत्ती आली. कोरोनाच्या महामारित या कुटुंबातील चार जणांचा वीस दिवसात मृत्यू झाला. कुटुंबातील जबाबदार माणसे अवेळी गेल्याने कुटुंबाची बसलेली घडी विस्कटली आहे.

साखरे (ता. धरणगाव) येथील शेती आणि खत विक्रीचे दुकानावर आपला उदरनिर्वाह करणारे अमृतकर कुटुंब मेहनती आणि संयमी होते. कुटुंबातील पुंडलिक गोपाल अमृतकर यांचे २ ऑक्टोबरला, शांताराम गोपाल अमृतकर यांचे ८ सप्टेंबर रोजी, सतीश पुंडलिक अमृतकर यांचे १ ऑक्टोंबर तर सुनील पुंडलिक अमृतकर अशा चार जणांचे निधन एका महिन्याच्या आत झाले. यात एकाच लोकसेवा हॉस्पिटल जळगाव येथे एकाचा रुबी हॉस्पिटलमध्ये तर मुलाच्या निधनाच्या धक्याने वडिलांचे निधन झाले आहे.

कुटूंबाचा आधार हरविले

कोरोनाच्या महामारीत अमृतकर (वाणी) कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. एकत्र कुटूंब असल्‍याने तेरा सदस्‍य आनंदात राहत होते. परंतु आनंदी कुटूंबावर नियतीने घाला घातल्‍याने कुटुंबातील कर्ते पुरुष गेले आणि कुटुंबाचा आधार राहिलेला नाही. शिवाय शेती, व्यवसायासाठी बँका, वि. का. सोसायटी, उसनवार असे कर्ज देखील आहे. अशावेळी घरातील महिला, लहान मुले हा भार कसा पेलतील हा प्रश्न कुटुंबासमोर उभा आहे. शासनाने, समाज व्यवस्थेने अशा कुटुंबाला आर्थिक सहकार्य करण्याची गरज आहे.

नुसत्‍या विचारातूनच मन सुन्न

कोरोनाच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च झाले. एकाच्या दुःखातून कुटुंब सावरत नाही; तोपर्यंत दुसरी दुःखद घटना घडत आहे. गेल्या महिनाभरापासून या कुटुंबाची काय अवस्था असेल याचा नुसता विचार केला तरी मन सुन्न होत आहे. एका मागे एक घटना घडत राहिल्‍याने कोरोनाची प्रचंड भिती कुटुंबातील अन्य सदस्यांमध्ये निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.