…ही तर ट्रायल मॅच आहे ; विधानपरिषदेच्या निकालावरून गुलाबराव पाटलांचा भाजपला टोला

0

जळगाव | राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली असून त्यात महाविकास आघाडीने घवघवीत यश प्राप्त केले असून भाजपच्या बालेकिल्ल्याला देखील खिंडार पडलं आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या एकजुटीपुढे भाजपचा सूफडासाफ झाला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपच्या हक्काच्या मतदारसंघात देखील महाविकास आघाडीला जबरदस्त यश मिळाले.

दरम्यान, या निकालावरून पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीचा निकाल म्हणजे सरकार चांगलं काम करत असल्याचा जनतेनेच दिलेला हा निर्वाळा आहे, असं सांगतानाच ही तर ट्रायल मॅच आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच राज्यपातळीवर आम्ही एकत्रित निवडणूक लढलो. त्यात आम्हाला घवघवीत यशही मिळाले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या जागीही आम्ही विजयी झालो आहोत.धुळे-नंदूरबार येथे अमरीश पटेल यांचा झालेला विजय हा भाजचा विजय नाही. पटेल हे त्यांच्या कामामुळे निवडून आलेले आहेत, असंही ते म्हणाले.

राज्यातील सरकार तीन चाकी नाही, तर हे चारचाकी सरकार आहे. हे चौथं चाक जनतेचं आहे, असं त्यांनी सांगितलं. जो शेतकऱ्यांशी भिडतो त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. देशभरातील शेतकरी जंतरमंतरवर मंतर मारल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.