हिरकणी महिला मंडळाच्या वतीने पत्रकारांचा गौरव

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा केला जात असतो या औचित्यपर शहरातील हिरकणी महिला मंडळाच्या वतीने पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला यावेळी हिरकणी महिला मंडळाच्या संस्थापिका सुचित्रा पाटील, नगरसेविका सविता राजपूत, सामाजिक कार्यकर्त्या अनिता शर्मा, पत्रकार संघाचे अध्यक्ष आर डी चौधरी, सचिव एम बी पाटील, जेष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर आदी पत्रकार उपस्थित होते.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून वेगवेगळ्या विषयांवर समाजाचे प्रश्न वृत्तपत्रातून मांडण्याचे कार्य पत्रकार करीत असून त्यामुळे पत्रकारिता घराघरात पोहोचली असल्याचे संस्थापिका सुचित्रा पाटील यांनी सांगितले तर शासन प्रशासन आणि नागरीक यातील दुवा पत्रकार बांधव राहिले असून निर्गवी पत्रकारितेचे महत्त्व आजही टिकून आहे असे सविता राजपूत यांनी सांगितले यावेळी जेष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष आर डी चौधरी यांनी आपल्या मनोगतातून आजची पत्रकारिता या विषयावर मार्गदर्शन केले

यावेळी किसनराव जोर्वेकर, आर.डी.चौधरी, एम.बी.पाटील, संजय सोनार, रमेश जानराव, आनन शिंपी, अर्जुन परदेशी, जिजाबराव वाघ, मोतीलाल अहिरे, सुनील राजपूत ,मनोहर कांडेकर, देविदास पाटील, मंगेश शर्मा, मुराद पटेल, दिलीप घोरपडे, गणेश पवार,सूर्यकांत कदम, उमेश बर्गे, छोटूलाल बोरसे, नारायण परदेशी, स्वप्नील वडनेरे, शरद पाटील आदी पत्रकार बांधवांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष  मोरे, धर्मराज बच्छे, प्रताप भोसले आदींचे सहकार्य लाभले

Leave A Reply

Your email address will not be published.