जळगाव शहराच्या महापौर सीमा भोळे यांचा राजीनामा

0

जळगाव :  शहराच्या भाजपच्या महापौर सीमा भोळे यांनी आज मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांच्याकडे  हा राजीनामा दिला आहे. ठरल्याप्रमाणे त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी आज राजीनामा दिला आहे. राजीनामा देतेवेळी भाजपचे सगळे नगरसेवक उपस्थित होते.

दरम्यान,  त्यांनी राजीनामा दिल्याने नवीन महापौरपदाची लवकरच निवड होईल. नवीन महापौर पदासाठी कैलास सोनवणे यांचं पत्नी भारती सोनवणे यांचे नाव आघाडीवर असून पक्ष श्रेष्टींकडे देखील त्यांचेच नाव आघाडी वर असल्याचे सांगितले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.