हिंदूराष्ट्र सेनेच्या बैठकीला युवकांचा मोठा प्रतिसाद

0

पाळधी ता धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पाळधी येथील गायत्री मंदिरात हिंदूराष्ट्र सेनेच्या बैठकीचेआयोजन करण्यात आले होते. या बैठकीस युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. काही दिवसांपूर्वी हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष संस्थापक श्री धनंजय भाई देसाई यांनी ऑगस्ट महिन्यात जळगाव येथे हिंदूराष्ट्र सेनेचे कार्यालयचे उद्घाटन केले व हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना दिशा व मार्गदर्शन केले. त्यावर आधारित हिंदू राष्ट्राचे कार्य पुढे नेण्यासाठी पाळधी येथे बैठकीचे आयोजन केले.

युवकांना मार्गदर्शनासाठी हिंदूराष्ट्र सेनेचेे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख मोहन तिवारी, नवयुवक जिल्हाध्यक्ष नीलू आबा सपकाळे तसेच अधिवक्ता आघाडी जिल्हा समन्वयक निरंजन चौधरी यांनी मार्गदर्शन केले.  हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी युवकांना न्यायालयीन जी मदत लागेल ती विनामूल्य केली जाईल, आजचे युवक व्यसनाधिन होत आहे, युवकांची दिशा भरकटली असून हिंदू राष्ट्र सेनेच्या माध्यमातून युवकांना दिशा देण्याचे कार्य करेल व युवकांना आवश्यक ती मदत करेल तसेच जिल्हा स्तरावर मोठ्या प्रमाणात वकिलांचे संघटन करण्यात येईल.  जिल्हा व तालुका या ठिकाणी कुठल्याही  वकिलाची आवश्यकता पडल्यास संघटनेच्या माध्यमातून मदत केली जाईल.

उत्तर महाराष्ट्र समन्वयक प्रमुख मोहन तिवारी यांनी आजच्या युवकांना संघटित राहण्याची आवश्यकता आहे.  तालुका, गाव व शहर युवक संघटित नाही. पक्ष व संप्रदायात विभागला गेला आहे. हिंदुराष्ट्र सेना युवकांचे मोठ्या प्रमाणात संघटन उभं करेल, हिंदुराष्ट्र सेना  कुठला पक्ष नसून  एक संघटना आहे.  जो नेता हिंदू धर्माचे कार्य करेल,  हिंदूंना मदत करेल, त्याला यापुढे नवयुवक  मतदान  करेल. तसेच पुढे येणारा मोठा आपत्काळ आहे. करुणा कळा पेक्षाही वाईट काळ येऊ शकतो, त्यासाठी हिंदू राष्ट्र सेना हिंदू युवकांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्यात कटिबद्ध आहे.  तसेच जीवनातील पाच सूत्रांचे महत्व युवकांना  तिवारींनी सांगितले.

गायत्री परिवाराचे पुरोहित सुभाष सुरळकर  यांनी सर्व संप्रदाय यांना एक होण्याचे आवाहन केले. या बैठकीला  ४०० युवकांची उपस्थिती होती. तसेच हिंदु राष्ट्र सेनेचे पदाधिकारी सुशिल इंगळे भुसावळ तालुकाप्रमुख, राहुल हटकर रिक्षा युनियन महानगरप्रमुख, आशिष ठाकरे विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख जळगाव, मा ग्रामपंचायत सदस्य संजू पांडे, प्रभाकर कोळी, सोनू बोरसे, कल्पेश फुलपगार , कमलेश माळी, अजय कुभार, योगेश चौधरी, गोलू माळी, सोनू कोळी, आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.