हिंगोणा येथे घराला आग ; जीवनावश्यक वस्तू जळून खाक

0

हिंगोणा, ता. यावल : येथील दत्त कॉलनीमधील रहिवासी अभिमान किटकूल पाटील यांच्या घराला सोमवारी सकाळी दहा वाजता अचानक आग लागून  जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. आगीचा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी एकच धावपळ करून मदत केली.  अभिमान पाटील व यांचे कुटुंब सकाळी ६ वाजता शेतात कामाला गेले  होते.  त्यामुळे आग लागली, त्यावेळी घरात कोणी नव्हते.

शेजारच्यांनी केली धावपळ 

घराला अचानक आग लागल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केले.  मिळेल तेथून पाणी आगीवर मारले जात होते. नागरिकांनी केलेल्या मदत कार्यामुळे आग  आटोक्यात आली.  घटनेबाबत तातडीने अभिमान पाटील यांना कळविण्यात आले. त्यांचे कुटूंब घरी आल्यानंतर त्यांनी घराची अवस्था पाहून रडायला सुरूवात केली.  तेथील रहिवासी भगवान पाटील यांनी तात्काळ तलाठ्यास फोन करून घटनास्थळी बोलावले.

तहसीलदारांकडे पाठविला अहवाल 

तलाठी डी. एच. गवई यांनी घटनास्थळी येऊन तात्काळ पंचनामा केला. त्या पंचनाम्यात अत्यावश्यक वस्तू पूर्णत: जळून खाक झाल्या असून त्यांच्या घरातील आगीत झालेले अंदाजीत नुकसान ३६ ते ५० हजाराचे असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. हिंगोणा तलाठी गवई यांनी तात्काळ पंचनाम्याची प्रत  तहसीलदार यावल यांना रवाना केली.  शेतकऱ्यास तात्काळ मदत मिळेल, असे आश्वासन तलाठ्यां दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.